बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी कायमच आपल्या चित्रपटातून सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ते लवकरच ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची एक झलक पाहायला मिळाली होती. यात मराठमोळा अभिनेता दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर नथुरामची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या टीझरलाही उत्तम प्रतिसाद मिळाला. नुकताच याचा ट्रेलरसुद्धा प्रदर्शित झाला.

गांधी हत्येच्या सीननंतर नथुरामला अटक होऊन तो तुरुंगात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात ते एकमेकांसमोर आपले विचार मांडताना दाखवले आहेत. म्हणूनच या चित्रपटाला एक वैचारिक युद्ध म्हणून सादर करण्यात आलं आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक राजकुमार संतोषी तब्बल ९ वर्षांनी पुनरागमन करत आहेत.

आणखी वाचा : ‘जोकर’ हे पात्र अजरामर करणाऱ्या अभिनेत्याने मृत्यूपूर्वी केलेला शेखर कपूर यांना फोन; दिग्दर्शकानेच केला खुलासा

नुकतंच या चित्रपटाचा एक खास शो मनोरंजनसृष्टीतील काही दिग्गज कलाकारांसाठी आयोजित करण्यात आला. बऱ्याच बड्याबड्या कलाकारांनी या स्क्रीनिंगला हजेरी लावली आणि चित्रपट पाहून झाल्यावर त्याबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं. दिग्दर्शक अभिनेता तिग्मांशु धूलिया यानेनेदेखील या स्क्रीनिंगला हजेरी लावली. यावेळी चित्रपट पाहून झाल्यावर तिग्मांशु म्हणाला, “तुम्ही पण गांधींबद्दल वाचलं आणि मीपण वाचलं आहे, पण तरी कुठेतरी आपल्याला त्यांच्यावर काढलेले चित्रपट बोरिंग वाटतात, पण हा एक खिळवून ठेवणारा चित्रपट आहे आणि आणि दोन्ही विचारधारांचा योग्य समतोल साधूनच हा चित्रपट आपल्यासमोर मांडला आहे.”

राजकुमार संतोषी यांच्या या चित्रपटात सेन्सॉर बोर्डाने एकही बदल न सुचवता प्रमाणपत्र दिलं आहे. ‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’शी याची टक्कर होणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.