सनी देओलचा ‘गदर २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ पहायला मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई केली आहे. चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट बघत आहेत. ज्या प्रेक्षकांनी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पाहिला आहे, ते OTT वर पुन्हा त्याचा आनंद घेण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, हा चित्रपट ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार याबाबतचा खुलासा चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी केला आहे.
इंडिया डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत अनिल शर्मा यांनी गदर २ च्या ओटीटी रिलीजबाबत भाष्य केलं आहे. शर्मा म्हणाले. “गदर २ ला ओटीटीवर बघण्यासाठी प्रेक्षकांना वाट पहावी लागणार आहे. हा चित्रपट अजून चित्रपटगृहांमध्ये आहे. ६ ते ८ महिन्यांत याची ऑनलाईन स्ट्रिमिंग सुरु होईल. तोपर्यंत अनेक प्रेक्षकांनी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये जाऊन बघितला असेल.” शर्मा यांच्या वक्तव्यानंतर ‘गदर २’च्या ओटीटी रिलीजसाठी प्रेक्षकांना वाट बघायला लागणार हे स्पष्ट झालं आहे.
गदर २’ साधारण दिवाळीच्या सुमारास ओटीटीवर येण्याची शक्यता वर्तवली जात होती. सध्या कोणताही चित्रपट प्रदर्शित झाल्यावर चार आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर येतो पण ‘गदर २’च्या बाबतीत असं होणार नाही हे स्पष्ट आहे.
हेही वाचा- ‘जवान’चं कलेक्शन शेअर करत खिलाडी कुमारने केलं किंग खानचं अभिनंदन; ट्वीट करत म्हणाला…
चित्रपटाच्या कमाईबाबत बोलायचं झालं तर या चित्रपटाने आत्तापर्यंत ५१४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने बाहुबली २ लाही मागे टाकले आहे. मात्र, शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटानंतर ‘गदर २’ च्या कमाईत घट झाल्याचे दिसून येत आहे. प्रदर्शनाच्या ३२ व्या दिवशी या चित्रपटाने ७५ लाख रुपयांची कमाई केली आहे.