बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी कायमच आपल्या चित्रपटातून सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ते लवकरच ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची एक झलक पाहायला मिळाली होती. यात मराठमोळा अभिनेता दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर नथुरामची भूमिका साकारत आहे.

या चित्रपटाच्या टीझरलाही उत्तम प्रतिसाद मिळाला. नुकताच याचा ट्रेलरसुद्धा प्रदर्शित झाला आहे. गांधी वधाचा सीननंतर नथुरामला अटक होऊन तो तुरुंगात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात ते एकमेकांसमोर आपले विचार मांडताना दाखवले आहेत. म्हणूनच या चित्रपटाला एक वैचारिक युद्ध म्हणून सादर करण्यात आलं आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक राजकुमार संतोषी तब्बल ९ वर्षांनी पुनरागमन करत आहेत.

आणखी वाचा : “RRR हा बॉलिवूड चित्रपट नाही..” गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकल्यानंतर दिग्दर्शक राजामौलींचं ‘हे’ वक्तव्य चर्चेत

या चित्रपटात सीबीएफसी बोर्डाने एकही बदल न सुचवता चित्रपटाला प्रमाणपत्र दिलं आहे. आजच्या काळात ही खूप मोठी गोष्ट आहे. राजकुमार संतोषी यांना याच गोष्टीची चिंता होती, त्याविषयी त्यांनी भाष्य केलं आहे. गांधीहत्या आणि त्यामागील पार्श्वभूमी असा वादग्रस्त विषय असतानासुद्धा यात कोणताही बदल न सुचवता हा चित्रपट पास करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दैनिक भास्करशी संवाद साधताना संतोषी म्हणाले, “माझ्या द लिजंड ऑफ भगत सिंगमध्ये ज्यापद्धतीने महात्मा गांधी यांना सादर केलं होतं त्यापेक्षा बरंच वेगळं चित्रण या चित्रपटात केलं आहे. मी खरंतर खूप घाबरलो होतो कारण सेन्सॉर बोर्ड या चित्रपटावर आक्षेप घेतील असं मला वाटलं होतं. पण तसं न करता चित्रपटातील एकही शब्द त्यांनी कापलेला नाही. हे खूप समाधानकारक आहे. ‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’शी याची टक्कर होणार आहे.