Khushboo Patani Indian Army Photos: आपल्या फॅशन व बोल्डनेसमुळे लोकप्रिय असलेली अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) हिला खुशबू नावाची मोठी बहीण आहे. दिशा फॅशनच्या दुनियेत सक्रिय आहे, तर तिची बहीण खुशबू पाटनी ही भारतीय सैन्यात अधिकारी राहिली आहे. स्वातंत्र्यदिन अवघ्या दोन आठवड्यांवर आहे, अशातच खुशबूने तिचे काही जुने फोटो शेअर केले आहेत.

भारतीय सैन्यात लेफ्टनंट राहिलेली खुशबू आता न्यूट्रिशनिस्ट, फिटनेस ट्रेनर व टॅरो कार्ड रीडर आहे. ती इन्स्टाग्रामवर लोकांना फिटने टिप्स देते. याशिवाय ती उत्तम डान्सही करते. खुशबू सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर जवळपास सात लाख फॉलोअर्स आहेत. खुशबू दिसायला बहीण दिशासाखीच सुंदर आहे.

वयात १४ वर्षांचे अंतर अन् लग्नानंतर ५ वर्षांनी झाले आई-बाबा; सेलिब्रिटी जोडप्याने दाखवले जुळ्या बाळांचे चेहरे, पाहा Photos

खुशबू पाटनीने शेअर केले फोटो

खुशबूने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर १० फोटो शेअर केले आहेत. हे सर्व फोटो ती भारतीय सैन्यात होती तेव्हाचे आहेत. तिने या फोटोंना भावनिक कॅप्शन दिलं आहे. “ऑगस्ट महिना आल्यावर माझ्या हृदयाची धडधड जास्त वाढते. माझे डोळे नेहमीच माझे माझ्या देशावर असलेले प्रेम दर्शवतात. का, ते तुम्हाला माहितीये का? कारण आम्ही आतापासूनच स्वातंत्र्य दिन साजरा करण्यास सुरुवात केली आहे! माझ्या सर्व महिला अधिकाऱ्यांना खूप खूप प्रेम,” असं खुशबूने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

खुशबूने ती सैन्यात असतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. यातील काही फोटो वसतीगृहातील आहेत, तर काही ट्रेनिंगचे आहेत. काही फोटोंमध्ये खुशबू लष्करी गणवेशात दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. ‘सैन्यात येण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी हे फोटो खूप प्रेरणादायी आहेत,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे.

विकी कौशलसह एकाच वर्गात शिकायची ‘ही’ टीव्ही अभिनेत्री; कतरिनाच्या पतीबद्दल म्हणाली, “तो अभ्यासात खूप…”

खुशबू पाटनीच्या फोटोंवरील कमेंट्स

‘तरुण पिढीसाठी खरी प्रेरणा,’ ‘किती सुंदर प्रवास! हे फोटो पाहून मी थोडी भावुक झाले, पण त्याचबरोबर आम्हाला तुझा अभिमान वाटतो,’ ‘तुमच्या सारख्या धाडसी मुलींची आपल्या देशाला गरज आहे,’ ‘तुझ्याकडे सर्वकाही असूनही तू देशभक्तीचा मार्ग निवडलास. आम्हाला तुझा अभिमान आहे,’ अशा कमेंट या फोटोंवर चाहत्यांनी केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Khusbhoo Patani army photos
खुशबू पाटनीने शेअर केलेल्या फोटोंवरील कमेंट्स

दिशा पाटनीला मोठ्या बहिणीचा खूप अभिमान आहे. दिशानेही अनेक मुलाखतींमध्ये कबूल केलं आहे की तिला तिची बहीण खुशबूकडून प्रेरणा मिळते. दिशा अनेकदा बहिणीचे फोटो शेअर करून प्रेम व्यक्त करत असते.