scorecardresearch

एक्स बॉयफ्रेंड टायगर श्रॉफच्या वाढदिवसानिमित्त दिशा पटानीची खास पोस्ट; ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाली…

Tiger Shroff Birthday: अभिनेत्री दिशा पटानीबरोबरच्या नात्यामुळेही टायगर खूप चर्चेत राहिला होता.

disha patani post for tiger shroff birthday
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अभिनेता टायगर श्रॉफचा आज ३३ वा वाढदिवस आहे. अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा असलेला टायगर बॉलिवूडमध्ये त्याच्या मार्शल आर्ट्स डान्ससाठी विशेष ओळखला जातो. २०१४ साली हिरोपंती चित्रपटामधून पदार्पण करणाऱ्या टायगरने अनेक अॅक्शनपटांमधून आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. याशिवाय अभिनेत्री दिशा पटानीबरोबरच्या नात्यामुळेही तो खूप चर्चेत राहिला. दोघांचं ब्रेकअप झालं असलं तरीही दिशाने टायगरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

थिएटरमध्ये सीटखाली सापडलेली चिमुरडी; उंदरांनी कुरतडलेलं शरीर, प्रकाश झा यांनी दत्तक घेतली होती लेक दिशा

दिशाने टायगरचा एक फोटो इन्स्टाग्रामच्या स्टोरीला पोस्ट केला आहे. त्यामध्ये टायगरने ब्लॅक जॅकेटवर वाघाचे पट्टे असतात, त्यासारखी एक टोपी घातली आहे. दिशाने त्यावर “Happy B’day tiggy, stay beautiful and inspiring” असं लिहिलं आहे. आहेस तसाच सुंदर आणि प्रेरणादायी राहा, असं दिशाने म्हटलं आहे. तिने गुलाबी हार्टही पोस्ट केले आहेत.

tiger shroff
दिशाने टायगर श्रॉफला दिल्या शुभेच्छा (फोटो – इन्स्टाग्रामवरून स्क्रीनशॉट)

दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ काही वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. दोघेही एकमेकांना डेट करत होते. या दोघांनी त्यांच्या नात्यावर उघडपणे बोलणं नेहमीच टाळलं होतं. पण बॉलिवूडच्या अनेक पार्ट्यांमध्ये तसेच कार्यक्रमात दोघंही नेहमीच एकत्र दिसत होते. पण, २०२२ मध्ये एके दिवशी त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली. तेव्हापासून दोघेही एकत्र दिसत नाहीत, पण आज टायगरच्या वाढदिवसानिमित्त दिशाने त्याच्यासाठी पोस्ट केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-03-2023 at 11:51 IST