आज हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणजे पंकज त्रिपाठी आहेत. नुकतेच ते भारताच्या ५३व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी इंडस्ट्रीत गॉडफादर नसताना मिळवलेल्या यशाबद्दल भाष्य केले. तसेच अभिनय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या नवोदित कलाकारांनाही त्यांनी मोलाचा सल्ला दिला.

हेही वाचा – “सानिया मिर्झाच्या आईला वाटलं मी वेडा आहे”; वरुण धवनने सांगितला ‘तो’ किस्सा

पकंज त्रिपाठी म्हणाले, “मी अतिशय साध्या कुटुंबातून आलो आहे. मी अशा गावातून आलोय, जिथे विजेसारखी मूलभूत सुविधा मिळवण्यासाठीही आम्हाला खूप संघर्ष करावा लागला. पण आम्ही आनंदी होतो. तेव्हा मी अभिनयाच्या जगापासून खूप दूर राहत होतो आणि आता माझे संपूर्ण आयुष्य अभिनयात आहे. माझे सिनेमावरील प्रेम आपोआप विकसित झाले. मी माझ्या गावी नाटकं बघायचो. तेव्हाच मला रंगभूमीची आवड निर्माण झाली आणि मग मी दिल्लीला गेलो आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. नंतर काही वर्षांनी मी मुंबईला गेलो आणि तेव्हापासून आजपर्यंत मी सिनेमाची कला शिकत आहे आणि पडद्यावर माझ्या अभिनयाद्वारे माझे कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. हा प्रवास मी पाहिलेल्या स्वप्नांच्या पलीकडे आहे,” असं ते म्हणाले.

हेही वाचा – गरोदर असल्याचं कळताच नीना गुप्तांनी जेव्हा विवियन रिचर्ड्सला केला होता फोन, आठवण सांगत म्हणाल्या, “मी खूप…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज अनेक तरुण पंकज त्रिपाठी यांच्याकडे आदर्श म्हणून पाहतात. त्या सर्वांना पंकज यांनी एक मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, “केवळ पैसा आणि प्रसिद्धीसाठी या व्यवसायात येऊ नये. तुम्हाला चित्रपटांमध्ये का यायचं आहे, ते आधी समजून घ्या. तुमचं प्रेम, तुमच्या गरजा समजून घ्या. कारण तुम्ही कोणतंही काम आवडीने कराल, तर आयुष्यात पैसा मिळेलच,”असं त्यांनी सांगितलं.