७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या ‘जवान’ने जबरदस्त धुमाकूळ घातला आहे. जगभरात ७०० कोटींच्या आसपास तर भारतात ५०० कोटींहून अधिक कमाई करत या चित्रपटाने सगळेच रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. या चित्रपटातील शाहरुखचे वेगवेगळे अवतारही प्रेक्षकांना पसंत पडले. म्हातारा शाहरुख, तरुण शाहरुख, पोलिस शाहरुख, टकला शाहरुख अशा विविध रूपात तो दिसला अन् प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं.

‘जवान’चा प्रीव्यू आला तेव्हा या सगळ्यात शाहरुखचा एक वेगळाच मास्क घातलेला लूकही चांगलाच चर्चेत आला होता. शाहरुखने घातलेला मास्क अन् ‘अपरिचित’मध्ये विक्रमने घातलेला मास्क यामध्ये बरंच साम्य प्रेक्षकांना आढळलं. यावरून बऱ्याच चर्चाही झाल्या. ‘अपरिचित’मधून ही गोष्ट कॉपी केल्याचंही काही लोकांनी सांगितलं, पण नुकतंच शाहरुखच्या या मास्कचं कनेक्शन वेनिस या शहराशीही आहे हे स्पष्ट झालं आहे.

आणखी वाचा : शाहरुख दिसला प्रथमच सासूबाईंसह, शाहिद व हार्दिक पांड्याची धमाल; मुकेश अंबानींच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी बॉलिवूड स्टार्सची हजेरी

‘जवान’मध्ये भ्रष्ट सरकारी यंत्रणा, सुरक्षा अन् वैद्यकीय क्षेत्रातील घोटाळे, उद्योजकांचे काळे धंदे, निवडणुकीदरम्यान सामान्यांची होणारी फसवणूक अशा कित्येक गंभीत समस्यांवर भाष्य केलं आहे. यापैकीच एका मुद्द्यावर काही सीन्स चित्रित करताना शाहरुखने हे मास्क घातल्याचं आढळून येतं. या मास्कमागची एक वेगळीच गोष्ट ‘द पेपरक्लिप’ने १६ ट्वीट थ्रेडच्या माध्यमातून सांगितली आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार १३ व्या शतकापासून वेनिस शहरातील लोकांना मास्कची प्रचंड आवड अन् सवय आहे. केवळ छानछुकी साठी नव्हे तर समाजातील विषमतेवर भाष्य करण्यासाठी या मास्कचा बराच वापर व्हायचा. १३ व्या शतकात तिथे जात-पात, धर्म, श्रीमंत गरीब यावरून बराच भेदभाव केला जायचा. या भेदभावाला प्रत्युत्तर म्हणून तिथल्या लोकांनी वेनिस कार्निवल फेस्टिव्हलमध्ये मास्क लावून सहभागी व्हायचं ठरवलं. यावेळी भेदभावाविरोधात सर्वप्रथम तिथल्या जनतेने मास्क लावून विद्रोह केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच गोष्टीचा संदर्भ घेऊन ‘जवान’मध्ये दिग्दर्शक अॅटलीने शाहरुखला मास्क घालण्यास सांगितला. ‘जवान’मध्येही या भ्रष्ट सरकारविरोधात अन् समाजातील विषमतेविरोधात, शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात शाहरुखचं पात्र विद्रोह करतं अन् त्या विद्रोहाचं प्रतीक म्हणून ‘जवान’मध्ये शाहरुखने चेहऱ्यावर अर्धा मास्क लावला आहे. शाहरुखचा तो हाल्फ सिल्व्हर मास्क हा कोलम्बिना मास्कचा एक प्रकार आहे. हा मास्क ओपेरामध्ये वापरला जातो.