नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेला ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची टीम सध्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केलं आहे. हा चित्रपट करोना काळात लसीचं संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांची सत्य कथा आहे. यामध्ये नाना यांनी कोवॅक्सिनचा शोध लावणाऱ्या टीमचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांची भूमिका साकारली आहे.

“मला पद्मश्री पुरस्कार का दिला?” नाना पाटेकरांचा प्रश्न; म्हणाले, “माझ्यासारख्या माणसाला…”

हा चित्रपट शूट करण्याआधी आपण डॉ. बलराम भार्गव यांनी भेटलो नव्हतो, असा खुलासा नाना पाटेकर यांनी केला आहे. “साधारणपणे कसं असतं की तुम्ही जेव्हा एखादी भूमिका साकारता तेव्हा ते समजून घेण्याचा प्रयत्न करता. जर एखाद्या जिवंत व्यक्तीची भूमिका साकारायची असेल तर आपण त्यांची भेट घेतो. पण मी डॉ. भार्गव यांना भेटण्यास नकार दिला. मी म्हटलं की खूप कमी वेळ आहे. एखाद्या व्यक्तीची भेट घेतल्यावर ते कसे दिसतात, ते कसे बोलतात, ते कसे चालतात याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न होईल, ज्यामुळे गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे चित्रपट पूर्ण झाल्यावर त्यांना भेटेन असं मी सांगितलं होतं,” असं नाना म्हणाले.

नाना पाटेकरांचं खरं नाव माहितीये का? रायगडमध्ये जन्मलेल्या नानांची कौटुंबीक व शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून थक्क व्हाल

नाना पाटेकर यांनी डॉ. भार्गव यांची चित्रपट पाहिल्यावर काय प्रतिक्रिया होती, त्याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “काही दिवसांपूर्वी डॉ. बलराम भार्गव आणि इतर सर्व शास्त्रज्ञांसाठी चित्रपटाचा शो ठेवण्यात आला होता. त्यात ७० टक्के महिला शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्यामुळे आज आपण सगळे मास्क न घालता बसू शकतोय. चित्रपट पाहिल्यानंतर पाणावलेल्या डोळ्यांनी डॉ. भार्गव माझ्याजवळ आले आणि म्हणाले, ‘तुम्ही माझी भूमिका इतकी चांगली कशी केली? कारण तुम्ही मला कधीच भेटले नव्हते’. मी म्हटलं जसं मला माझ्या दिग्दर्शकाने सांगितलं तसं मी केलं. त्यावर ते म्हणाले, ‘हो पण इतकं हुबेहुब कसं असू शकतं’. मी याचं श्रेय विवेकला दिलं आणि त्याने समजावल्यामुळे ते सहज शक्य झालं, असं म्हणालो.”

“राष्ट्रवादाच्या नावाखाली पैसे कमवणे….”, नसीरुद्दीन शाहांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नाना पाटेकरांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सत्य घटनांवर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘द व्हॅक्सिन वॉर’ मध्ये नाना पाटेकर यांच्याशिवाय अनुपम खेर, सप्तमी गौडा, पल्लवी जोशी, गिरीजा ओक आणि रायमा सेन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.