बॉलिवूड अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला ‘दृश्यम २’ हा चित्रपट १८ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. ‘दृश्यम’ चित्रपटाच्या या सिक्वेलसाठी प्रेक्षक प्रचंड आतुर होते. २०१४ मध्ये ‘दृश्यम’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या उयकंठावर्धक कथेने सर्वांनाच भुरळ घातली. आता ‘दृश्यम २’ही बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात हा चित्रपट १०० कोटी कमाईचा आकडा गाठणार असल्याचे दिसत आहे.
‘दृश्यम २’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १५.३८ कोटींची कमाई केली. ‘दृश्यम २’ हा ‘ब्रह्मास्र’ नंतर पहिल्या दिवशी जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला. तर पहिल्याच विकएण्डला ‘दृश्यम २’ने बॉक्स ऑफिसवर ६४.१७ कोटींचा गल्ला जमवला होता. तसंच या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच ‘दृश्यम २’चा बॉक्स ऑफिसवर दबदबा असल्याचं पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : ‘कौन है वो…’ अजय देवगणच्या बहुचर्चित ‘भोला’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
सोमवारी म्हणजेच प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी या चित्रपटाने १० कोटींची कमाई केली होती. तर त्या पाठोपाठ आता मंगळवारी या चित्रपटाने 11 कोटींचा गल्ला जमवला. आतापर्यंत या चित्रपटाची एकूण कमाई ८७.०१ कोटी झालेली आहे. त्यामुळे बुधवार किंवा गुरुवारपर्यंत हा चित्रपट 100 कोटींचा आकडा पार करेल असं स्पष्ट दिसत आहे.
हेही वाचा : “प्रेक्षक खूप हुशार झालेत आणि…” बॉलिवूड चित्रपट अयशस्वी होण्याबद्दल अजय देवगणचं मोठं वक्तव्य
‘दृश्यम २’ चित्रपटात अजय देवगणसह तब्बू, अक्षय खन्ना, श्रीया सरन, इशिता दत्ता यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ बोडकेही चित्रपटात झळकला आहे.