scorecardresearch

“२ ऑक्टोबरला तिकिटे बुक करा आणि…”, ‘दृश्यम २’च्या निर्मात्यांची प्रेक्षकांसाठी खास ऑफर

दरवर्षी २ ऑक्टोबरला दृश्यमची आठवण प्रेक्षकांना होतेच.

“२ ऑक्टोबरला तिकिटे बुक करा आणि…”, ‘दृश्यम २’च्या निर्मात्यांची प्रेक्षकांसाठी खास ऑफर
bollywood film

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘दृश्यम’ चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांवर वेगळीच छाप सोडली होती. सस्पेन्स थ्रिलर असलेल्या या चित्रपटातील अजय देवगणचा अंदाज प्रेक्षकांना खूपच आवडला होता. त्यानंतर दरवर्षी २ ऑक्टोबरला दृश्यमची आठवण प्रेक्षकांना होतेच. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आजच्या या खास दिवशी चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांना एक खास ऑफर दिली आहे.

आणखी वाचा : “प्रेक्षकांना थिएटरकडे खेचण्याची ताकद आता स्टार्सकडे नाही…”, शत्रुघ्न सिन्हा यांनी मांडले स्पष्ट मत

‘दृश्यम २’ हा चित्रपट १८ नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे आणि या चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘दृश्यम २’चे तिकीट बुक करणाऱ्यांना रिलीजच्या दिवशी तिकिटाच्या किमतीत ५० टक्के सवलत मिळेल, असे निर्मात्यांनी जाहीर केले आहे. म्हणजेच, १८ नोव्हेंबरला ‘दृश्यम २’ प्रदर्शित होईल तेव्हा प्रेक्षकांना तो निम्म्या किमतीत पाहता येईल. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी निर्मात्यांच्या या शानदार ऑफरने चाहत्यांना मोठे सरप्राईज मिळाले आहे.

हेही वाचा : पाचव्यांदा बदलण्यात आली अजय देवगणच्या ‘मैदान’ची रिलीज डेट, समोर आले कारण

नुकताच ‘दृश्यम २’चा टीझर प्रदर्शित झाला होता. त्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढवली. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक पाठकने केलं आहे. या चित्रपटात अजयसह श्रिया सरन, तब्बू, इशिता दत्ता यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या १८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या