ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल हिचा वर्षभरापूर्वी घटस्फोट झाला. १२ वर्षांच्या संसारानंतर ईशा पती भरत तख्तानीपासून वेगळी झाली. आता वर्षभराने भरत तख्तानीने त्याच्या आयुष्यात आलेल्या नवीन तरुणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. भरतने इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला त्याने दिलेलं कॅप्शन चर्चेत ठरलं आहे. भरत तख्तानीने गर्लफ्रेंडबरोबरचं नातं अधिकृत केलं आहे. त्याच्या गर्लफ्रेंडनेही एक फोटो पोस्ट करून नवी सुरुवात असं म्हटलं आहे.
फोटोमध्ये भरत व त्याची गर्लफ्रेंड एकमेकांकडे प्रेमाने पाहत आहेत. भरतने ‘माझ्या कुटुंबात स्वागत’ असं कॅप्शन देत भरतने मेघनाबरोबर फोटो पोस्ट केला आहे. त्याचबरोबर त्याने रेड हार्ट इमोजी वापरला आहे. मेघनाला टॅग करत It’s Official असा हॅशटॅग त्याने वापरला आहे.
भरतने केलेली पोस्ट

भरतच्या गर्लफ्रेंडची पोस्ट
भरत तख्तानी जिच्या प्रेमात आहे, तिचं नाव मेघना लाखानी आहे. मेघनाने भरतची स्टोरी रिपोस्ट केली आहे. त्याचबरोबर एक नवा फोटोही पोस्ट केला आहे. ‘प्रवास सुरू झालाय’ असं मेघनाने फोटोवर लिहिलं आहे. मेघना व भरतने स्पेनमधील माद्रिदमधून हे फोटो शेअर केले आहेत.

कोण आहे मेघना लाखानी?
Who is Meghna Lakhani : मेघना लाखानी ही उद्योजक आहे, असं तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर लिहिलं आहे. मेघना जवळपास ७७ देश फिरली आहे. ती लाइफस्टाइल व इव्हेंट संबंधित कामं करते. इन्स्टाग्रामवर मेघनाचे ८० हजारांहून जास्त फॉलोअर्स आहेत.
ईशा व भरतचं लग्न आणि घटस्फोट
ईशा देओल व भरत तख्तानी यांनी २०१२ मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना राध्या व मिराया या दोन मुली आहेत. भरत व ईशा यांनी १२ वर्षांच्या संसारानंतर २०२४ मध्ये घटस्फोटाची घोषणा केली. सहमतीने वेगळं व्हायचा निर्णय घेतला असून मुलींचं संगोपन एकत्र करणार असं ते घटस्फोटाच्या निवेदनात म्हणाले होते.