‘कुछ कुछ होता है’ मधील प्रिन्सिपल मल्होत्रा असो…’दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’मधले राजचे वडील ते ‘द काश्मीर फाइल्स’मधल्या पुष्कर पंडित यांच्या भूमिकेपर्यंत…; ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने नेहमीच रसिक प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत.

बॉलीवूडमध्ये चार दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या या दिग्गज कलाकाराच्या कारकिर्दीचा आढावा आपण आज एक्स्प्रेस अड्डाच्या निमित्ताने घेणार आहोत. अनुपम खेर यांची चिकाटी, त्यांची आवड, त्यांचा जीवनप्रवास तुमच्यासाठी देखील नक्कीच प्रेरणादायी ठरेल. आज प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी अभिनेते अनुपम खेर ‘द इंडियन एस्क्प्रेसच्या’ एक्स्प्रेस अड्डामध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्याशी इंडियन एक्सप्रेसचे एक्झ्युकेटिव्ह एडिटर अनंत गोएंका यांनी संवाद साधला. पाहा व्हिडीओ…

अनुपम खेर यांनी हिंदी सिनेमांचं बदलतं स्वरुप, चित्रपटांचे बदलते विषय, त्यांचं सुरुवातीचं आयुष्य अशा अनेक विषयांवर गप्पा मारल्या. तसेच प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरं दिली.