अजय देवगणबरोबर ‘दिल तो बच्चा है जी’ आणि रणबीर कपूरबरोबर ‘रॉकेट सिंग’मध्ये झळकलेली अभिनेत्री शाजान पदमसी (Shazahn Padamsee Engagement) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. या अभिनेत्रीने तिच्या बॉयफ्रेंडबरोबर साखरपुडा केला आहे. तिने साखरपुड्यातील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे. शाजान लग्न कधी करणार? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

३७ वर्षांची शाजान पदमसी व आशिष कनाकिया मागील काही वर्षांपासून डेट करत होते, आता त्यांनी साखरपुडा करून नात्यात पुढे जायचं ठरवलं आहे. शाजानचे होणारे पती आशिष हे कनाकिया ग्रुपचे डायरेक्टर आणि मूव्ही मॅक्स सिनेमाचे सीईओ आहेत.

शाजान व आशिष यांनी २० जानेवारीला साखरपुडा केला. साखरपुड्यासाठी दोघांनी पारंपरिक कपड्यांमध्ये ट्विनिंग केलं. शाजानने या खास दिवसासाठी लेहेंगा निवडला, तर आशिष कनाकियाने शेरवानी घातली होती. फोटोंच्या कॅप्शनमध्ये शाजानने साखरपुडा केल्याचं सांगितलं आहे.

पाहा पोस्ट –

शाजान पदमसी व आशिषची भेट एका कॉमन फ्रेंडद्वारे झाली होती. “माझी आणि शाजानची ओळख माझ्या बालपणीच्या मित्राने करून दिली होती. मी पहिल्याच भेटीत आशिषकडे आकर्षित झाले होते. मात्र, मी घाई केली नाही. काही महिन्यांनंतर आम्ही दोघे डिनरवर भेटलो आणि नंतर आम्ही डेटिंग करू लागलो,” असं शाजान म्हणाली होती.

शाजानने तिच्यात व आशिषमध्ये काय साम्य आहे, ते सांगितलं होतं. “आम्ही दोघे एकत्र खूप हसतो आणि मस्ती करतो. तो माझ्यावर खूप जोक्स करतो, आता मी हळूहळू ते जोक्स स्वीकारायला शिकले आहे. आशिष खूप काळजी घेणारा आहे. आम्ही दोघे पूर्णपणे वेगळ्या पार्श्वभूमीतून आलो आहोत,” असं शाजान म्हणाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाजान पदमसीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘हाउसफूल 2’, ‘ऑरेंज’, ‘कनिमोळी’, ‘मसाला’, ‘पागलपन नेक्स्ट लेव्हल’, ‘डिस्को व्हॅली’ यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शाजान व आशिषने साखरपुडा केला आहे, मात्र ते दोघेही लग्न कधी करणार याबाबत त्यांनी सांगितलेलं नाही. दोघेही यावर्षी लग्न करतील, अशा चर्चा होत आहेत.