scorecardresearch

जगभरात ‘पठाण’ने कमावले ७०० कोटी, शाहरुख खाननेच सांगितली खरी आकडेवारी, म्हणाला, “अजूनही…”

शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ चित्रपटाची खरी कमाई किती? अभिनेत्यानेच दिलं उत्तर

shahrukh khan pathaan
(फोटो सौजन्य- शाहरुख खान इन्स्टाग्राम)

शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ चित्रपट दहा दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. दहा दिवसांत या चित्रपटाने जगभरात ७२५ कोटी रुपये कमाई केली आहे. तर देशभरात हा चित्रपट ४०० कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. चित्रपटाला मिळत असलेलं यश पाहता शाहरुखही अगदी भारावून गेला आहे.

आणखी वाचा – विवाहित दिग्दर्शकावर जडलं होतं प्रेम, दोघांना एकत्र पाहिल्यानंतर पत्नीने उर्मिला मातोंडकरच्या कानाखाली मारली अन्…

‘पठाण’च्या यशानंतर शाहरुखने #AskSRK ट्विटर सेशन घेतलं. या सेशनद्वारे चाहत्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांची शाहरुखने अगदी दिलखुलासपणे उत्तरं दिली. शिवाय ‘पठाण’ची रेकॉर्डब्रेक कमाई पाहून शाहरुख खूश असल्याचंही यावेळी दिसून आलं. त्याला चाहत्यांनी ‘पठाण’साठी शुभेच्छाही दिल्या.

यावेळी “‘पठाण’ चित्रपटाची खरी कमाई किती आहे?” असा प्रश्न एका चाहत्याने शाहरुखला विचारला. यावेळी शाहरुखने अगदी त्याच्या स्टाइलने उत्तर दिलं. तो म्हणाला, “५००० कोटींचं प्रेम, ३००० कोटींची प्रशंसा, ३२५० कोटी मिठी, २ बिलियन हास्य आणि अजूनही मोजत आहे. तुझा अकाऊटंट काय सांगत आहे?”

आणखी वाचा – देशमुखांची सून झाल्यानंतर पिठलं-भाकरी आवडीने खाते जिनिलीया, पण स्वतः जेवण बनवताना तेलाचा वापरच करत नाही कारण…

शाहरुखने अगदी वेगळ्याच अंदाजात उत्तर देत चाहत्यांचं मन जिंकलं. शाहरुखच्या या चित्रपटाने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. शाहरुख व दीपिकासाठी हे मोठं यश आहे. ‘दंगल’, ‘बाहुबली २’, ‘केजीएफ २’ सारख्या चित्रपटांप्रमाणेच ‘पठाण’ही कमाई करत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 19:37 IST
ताज्या बातम्या