‘जनशीन’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत खळबळ माजवणारी अभिनेत्री सेलिना जेटलीला बॉलिवूडमध्ये म्हणावं तस यश मिळाले नाही. काही चित्रपट केल्यानंतर तिने पीटर हागशी लग्न केले. हे जोडपे सुखी विवाहित जीवनाचा आनंद घेत आहे. त्यांना तीन मुलं आहेत. अलीकडेच सेलिनाला ट्विटरवर एका चाहत्याने लग्नाची मागणी घातली या मागणीवर तिने मजेदार प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा- “मला अनुष्का शर्माचं संपूर्ण करिअर संपवायचं होतं” करण जोहरचा ‘तो’ व्हिडीओ पाहून कंगना रणौत भडकली, म्हणाली, “याला फक्त…

एका ट्विटर युजरने गुरुवारी सेलिनाच्या पोस्टमध्ये लिहिले की, “सेलिना जेटली यांना शुभेच्छा. माझी तब्येत बरी नाही. माझी काळजी घ्यायला कोणी नाही. माझी तब्येत बिघडण्याआधी मला लवकर तुझ्याबरोबर घेऊन जा. लवकरात लवकर लग्न कर. मी घरजावई बनायला तयार आहे. माझा जीव आणि आरोग्य वाचव. उत्तर आणि प्रतिसाद द्या. आदर. कोलकात्यातून विजय मगनलाल व्होरा.”

चाहत्याने सेलिना जेटलीला घातली लग्नाची मागणी

चाहत्याच्या या लग्नाच्या प्रस्तावावर सेलिनाने मजेशीर उत्तर दिले. चाहत्यांच्या पोस्टला उत्तर देताना सेलिनाने लिहिले, “मी माझ्या पतीला आणि तीन मुलांना विचारेन आणि परत येईन!” सेलिनाच्या या गंमतीशीर उत्तरावर चाहते रिप्लाय देत आहेत. एकाने ‘अमुल्य प्रतिसाद’ म्हणले आहे. तर एकाने ‘काय मस्त प्रतिक्रिया’ आहे म्हणत सेलिनाच्या गंमतीशीर उत्तराचे कौतुक केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
चाहत्याच्या ट्वीटला सेलिनाने दिले मजेशीर उत्तर

कृपया सांगा की सेलिना जेटलीने ऑगस्ट २०११ मध्ये पीटर हागशी लग्न केले. या जोडप्याला ११ वर्षांची दोन जुळी मुले आणि पाच वर्षांचा मुलगा आर्थर आहे. हे जोडपे ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले आहे. सेलिना चित्रपटांपासून दूर असून आपले वैवाहिक आयुष्य सुखाने जगत आहे. सलिना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इन्स्टावर ती स्वतःचे आणि तिच्या कुटुंबाचे फोटो शेअर करत असते. सेलिनाच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, तिने ‘जनशीन’, ‘नो एंट्री’, ‘अपना सपना मनी मनी’ आणि ‘गोलमाल रिटर्न्स’मध्ये काम केले आहे.