अजय देवगण व मृणाल ठाकुरचा बहुचर्चित चित्रपट ‘सन ऑफ सरदार 2’ रिलीज झाला आहे. चित्रपटातील कलाकार सध्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. नुकतेच अजय देवगण व मृणाल ठाकूर फराह खानच्या घरी आले होते. त्यावेळी दिलीप (फराहच्या घरी जेवण बनवणारा कुक) घरी होता. मृणाल, दिलीप व फराह यांनी शाहीर पनीर बनवले तसेच खूप गप्पा मारल्या. फराहने सांगितलं की ती दिलीपला १३ वर्षांपूर्वी अजय देवगणच्या घराबाहेर भेटली होती.

फराह खान म्हणाली की दिलीपचा भाऊ भोला अजय देवगणच्या घरी काम करायचा. दिलीपची अजयच्या आईबरोबर मैत्री झाली होती. अजयच्या आईने मुलाच्या एका सिनेमाचं तिकिट दिलीपला दिलं होतं.

फराह खानला कुठे भेटला होता दिलीप?

अजय देवगण आधी म्हणाला की तो बाहेरच वाट पाहणार आहे, स्वयंपाकघरात जाणार नाही. पण नंतर तो फराह व मृणालची मदत करायला गेला. त्यावेळी दिलीपने त्याला सांगितलं की तो अजयचा खूप मोठा चाहता आहे. मग फराहने दिलीप तिला पहिल्यांदा कुठे भेटला होता, ते सांगितलं.

अजय देवगणच्या बंगल्याबाहेर फिरत होता दिलीप

फराह म्हणाली, “तुला माहितीये हा मला कुठे भेटला? ही गोष्ट तर मी तुला सांगायलाच हवी. हा तुझ्या बंगल्याबाहेर फिरत होता. मी ते कधीच विसरू शकत नाही. हा तुझ्या बंगल्याबाहेर फिरत होता आणि तुझ्या आईने त्याला ‘सन ऑफ सरदार’ सिनेमाचं तिकीट दिलं होतं.”

View this post on Instagram

A post shared by Farah Khan Kunder (@farahkhankunder)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजय देवगणच्या घरी काम करायचा दिलीपचा भाऊ

दिलीप आनंदाने म्हणाला, “आईबरोबर (अजय देवगणची आई) चांगली ओळख होती. कारण माझा लहान भाऊ भोला इथे काम करायचा.” नंतर फराहने अजयला विचारलं की त्याच्या आईला दिलीप आठवतो का. दिलीप अजयला भेटून खूप आनंदी झाला. त्याने फराहचे आभार मानले. चाहतेही फराहचं कौतुक करत आहेत की तिने त्याची आवडत्या स्टारबरोबर भेट घालून दिली.

कोण आहे दिलीप?

दिलीप हा फराह खानच्या घरी जेवण बनवतो. तो मूळचा बिहारमधील दरभंगा इथला आहे. त्याची पत्नी, मुलं व आई-वडील गावी राहतात. नुकतंच दिलीपने गावी तीन मजली घर बांधलंय. त्या घरी स्विमिंग पूलदेखील आहे. दिलीपने जमीनही खरेदी केली आहे. तो फराह खानच्या घरी १० वर्षांहून जास्त काळापासून काम करतोय.