Farah Khan on late marriage: फराह खान ही तिच्या कोरिओग्राफी आणि चित्रपटांच्या निर्मितीसाठी ओळखली जाते. त्याबरोबरच तिने काही चित्रपटदेखील प्रदर्शित केले आहेत. सध्या व्लॉगमुळेदेखील फराह खान चर्चेत असते.
फराह खानच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळते की, ती अनेक लोकप्रिय कलाकारांच्या घरी जाते. कलाकारांच्या घरी ती तिचा कूक दिलीपसह जाते. त्यांच्याशी गप्पा मारते. त्यांच्या किचनमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवते.
आता नुकत्याच यूट्यूबवर आलेल्या तिच्या व्लॉगमध्ये ती रिबेल किड म्हणून ओळखली जाणाऱ्या अपूर्वा मुखर्जीच्या ती घरी गेली होती. त्यावेळी तिने, तिला लवकर लग्न करायचे होते; पण तिच्या आईमुळे तिला लवकर लग्न करता आले नाही, असे सांगितले. आता फराह खान असं का म्हणाली, ते जाणून घेऊ…
फराह खान काय म्हणाली?
फराह खानच्या व्लॉगमध्ये २३ वर्षीय अपूर्वाने तिने आतापासूनच लग्नाचा विचार करण्यास सुरुवात केल्याचे सांगितले. त्यावर फराहने आश्चर्य व्यक्त केले. “इतक्या कमी वयात लग्न करू नको,” असे तिने सल्ला दिला. त्यानंतर तिने तिच्या लग्नाविषयी सांगितले. त्याबरोबरच तिलादेखील वयाच्या २३ व्या वर्षीच लग्न करायचे होते, असा खुलासा तिने केला.
फराह खान म्हणाली, “२३ व्या वर्षी मला लग्न करायचं होतं. आयुष्यात करण्यासाठी काही राहिलं नाही, असं मला वाटत होतं. जेव्हा मी आईला मला लग्न करायचं आहे, असं सांगितलं. तेव्हा माझ्या आईनं त्याला विरोध केला होता. माझी आई म्हणाले की, मी त्यानंतर खूप रडले आणि गोंधळ घातला. इतर पालकांना त्यांच्या मुलीनं लग्न करावं, असं वाटतं आणि तू मला लग्न करू नको, असं म्हणत आहेस. तू माझी शत्रू आहेस.”
उशीरा लग्न केल्याबाबत फराह खान म्हणाली की, मी ४० च्या जवळपास लग्न केलं. मी खूप आनंदी आहे. मला तीन सुंदर मुलं आहेत. माझा नवरा खूप चांगला आहे.
फराह खानच्या पतीविषयी बोलायचे, तर शिरीष कुंदर असे तिच्या पतीचे नाव आहे. २१ चित्रपटांमध्ये एडिटर म्हणून काम केल्यानंतर शिरीष यांनी जान-ए-मन या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. फराहने ‘मैं हूँ ना’ या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले. यादरम्यानच त्यांची त्यांची भेट झाली होती.
दरम्यान, इंडिया गॉल लेटेंटमुळे अपूर्वा मुखर्जी मोठ्या चर्चेत आली होती. तिच्या वक्तव्यांची अनेकदा चर्चा