अभिनेता फरदीन खानने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या फरदीन त्याच्या व्यक्तीक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. फरदीन आणि त्याची पत्नी नताशा माधवानीमध्ये वाद सुरु असल्याची चर्चा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते दोघे विभक्त राहत असल्याचे सांगण्यात येते. एवढंच नाही तर दोघे घटस्फोट घेणार असल्याची चर्चाही ऐकायला मिळत आहे.

हेही वाचा- “हा चित्रपट करण जोहरचा…” ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’बद्दल अनुराग कश्यपची पोस्ट चर्चेत

ई-टाइम्सच्या बातमीनुसार, फरदीन आणि त्याची पत्नी नताशामध्ये वाद सुरु आहेत. दोघांमधील अंतर इतके वाढले आहे की दोघेही एक वर्षापासून एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. फरदीन मुंबईत राहतो, तर नताशा तिच्या आईसोबत लंडनमध्ये राहते. आता फरदीन आणि नताशाने एकमेकांबरोबर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. घटस्फोटाच्या या वृत्तावर अद्याप फरदीन आणि नताशाची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

नताशा ८० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज यांची मुलगी आहे. २००५ मध्ये फरदीन आणि नताशाने लग्नगाठ बांधली. या जोडप्याला दोन मुले आहेत.

हेही वाचा- “तीन वर्ष ऑडिशन्स देऊन…”, बॉलीवूड अभिनेत्याला आठवले संघर्षाचे दिवस; म्हणाला, “बायकोचे दागिने, राहते घर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फरदीनच्या वर्कफ्रंटबाबात बोलायचं झालं तर गेली अनेक वर्ष तो अभिनय क्षेत्रापासून लांब आहे. फरदीनने २००१ मध्ये ‘प्रेम अगन’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट त्याचे वडील फिरोज खान यांनी दिग्दर्शित केला होता. त्यावेळेस त्याला चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्धी मिळाली होती. फरदीन त्याच्या करिअरमध्ये ‘नो एंट्री’ आणि ‘हे बेबी’ सारख्या मल्टीस्टारर चित्रपटांचा भाग होता. परंतु त्याला एकही हिट चित्रपट मिळाला नाही.