मोठ्या पडद्यावर किंवा ग्लॅमर जगतात सर्वकाही चांगलं चालल्याचं दाखवलं जातं. त्या कलाकारांच्या खासगी आयुष्यात मात्र बरीच उलथा-पालथ झालेली असते. ज्याचा अंदाज बांधणंही आपल्यासाठी कठीण आहे. ग्लॅमर दुनियेत हसऱ्या चेहऱ्याने वावरणारे हे कलाकार त्या चेहऱ्यामागे किती दुःख घेऊन फिरत असतील याचा अंदाज बांधण सामान्य लोक लावू शकत नाहीत. आपल्या आयुष्यात घडलेल्या धक्कादायक अनुभवांबद्दल जेष्ठ अभिनेत्री डेझी ईराणी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तरची मावशी डेझी ईराणी यांनी १९५० मध्ये बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती. बालपणी मिळालेली प्रसिद्धी, लाइमलाइट यात त्यांचं आयुष्य किती चांगलं असेल सर्वांना वाटेल. पण वयाच्या ६ व्या वर्षीच त्यांच्यावर बलात्कार झाला होता आणि बलात्कार करणारी व्यक्ती त्यांची केअर टेकर होती. याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केला होता.

आणखी वाचा- नाना पाटेकरांना राजकुमार म्हणालेले अडाणी, ‘तिरंगा’मध्ये एकत्र काम करण्याआधीच दिग्दर्शकाला दिली होती धमकी

‘मुंबई मिरर’ दिलेल्या मुलाखतीत डेझी ईराणी म्हणाल्या, “ज्या व्यक्तीने माझ्यावर बलात्कार केला होता. तो माझा केअर टेकर होता. तो चेन्नईला माझ्याबरोबर ‘हम पंछी एक डाल के’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी आला होता. एका रात्री त्याने हॉटेलमध्येच माझ्यावर बलात्कार केला. मला पट्ट्याने मारहाण केली आणि मला धमकी दिली होती की, हे सर्व मी कोणाला सांगितल्यास तो मला मारून टाकेल.”

डेझी ईराणी पुढे म्हणाल्या, “आता तो माणूस मेला आहे. त्याचं नाव नजर असं होतं. तो जोहराबाई अंबालेवालीच्या नात्यातील होता. त्यामुळे त्याच्या चित्रपटसृष्टीत बऱ्याच ओळखी होत्या. माझी आई मला कोणत्याही परिस्थितीत स्टार बनवू इच्छित होती. मी मराठी चित्रपटातून पदार्पण केलं होतं. आजही माझ्या मनात त्या घटनेच्या आठवणी तशाच आहेत. त्या वेदना आणि पट्ट्याने केलेली मारहाण आजही मला आठवते. पण त्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी मी नॉर्मल होऊन सेटवर परत गेले होते. आईला सांगण्याची हिंमत माझ्यात अजिबात नव्हती.”

आणखी वाचा- कहानी पुरी फिल्मी हैं! वडिलांचा विरोध, विवाहित जावेद अख्तर यांच्यावर जडलेलं प्रेम अन्…; शबाना आझमींची भन्नाट लव्हस्टोरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डेझी म्हणाल्या, “या घटनेनंतर जवळपास १० वर्षांनंतर माझ्या आईला याबद्दल समजलं. पण ती काहीच करू शकली नाही. आईला बलात्काराबद्दल सर्व समजलं त्यावेळी मी १५ वर्षांची होते. ती माझ्याकडे आली आणि मला विचारलं हे खरं आहे का? जेव्हा मी म्हणाले की हो हे खरं आहे तेव्हा तिला याची लाज वाटली. ती माझी माफी मागू लागली होती आणि तो क्षण खूप वेदनादायी होता.” डेझी यांच्या मते बालकलाकरांसाठी चित्रपटसृष्टी तितकीशी चांगली नाही. अशाप्रकारच्या घटना त्यांच्यासाठी खूपच धक्कायक असतात.