बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपले अभिनय कौशल्य सिद्ध करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले बॉलीवूड सोडण्याचे कारण सांगितले होते. बॉलिवूडमध्ये तिच्या विरोधात गटबाजी होत होती. तिला कॉर्नर केले जायचे. चित्रपट हिट जाऊनही तिला काम दिले जात नव्हते असा खुलासा प्रियांकाने केला आहे.
प्रियांकाच्या या खुलासानंतर अनेक कलाकार प्रियांकाच्या समर्थनार्थ उभे राहिले आहेत. बॉलिवूड क्वीन कंगना रणौतने प्रियांकाचे समर्थन करत चित्रपट निर्माता करण जोहरवर अनेक आरोप केले आहेत. करण जोहरने प्रियांकावर बंदी घातली होती त्यामुळेच तिला बॉलिवूड सोडावे लागले. आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि चित्रपट निर्माता अपूर्व असरानी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा- ‘आरआरआर’ला तमिळ चित्रपट म्हटल्यानंतर प्रियांका चोप्रा ट्रोल; नेमकं काय आहे प्रकरण?
अपूर्व असरानी यांचे प्रियांकाला समर्थन
अपूर्व असरानीनेही ट्विट करत लिहिले की, ‘अखेर प्रियंका चोप्राने ती गोष्ट उघड केली, ज्याबद्दल सर्वांना माहिती आहे, परंतु कोणीही एक शब्दही बोलला नाही. ना उदारमतवादी ना स्त्रीवादी. प्रियांका चोप्रावर बहिष्कार टाकणाऱ्या लोकांचे तो अभिनंदन करतो. नटीला बरबाद करणाऱ्या राजांचा जयजयकार. प्रियांका हॉलिवूडमध्ये जाणे हा मोठा विजय आहे. म्हणून तिचे नशीब सुशांत सिंग राजपूत किंवा परवीन बाबीसारखे झाले नाही.
विवेक रंजन यांचेही ट्वीट करत कंगनाला समर्थन
द काश्मीर फाइल्स चित्रपटाचे निर्मात विवेक रंजन अग्निहोत्री यांनीही प्रियांकाच्या समर्थनार्थ ट्वीट केले होते. ट्विटमध्ये लिहिले की, ‘जेव्हा उद्योगातील मोठे लोक दादागिरी करतात, गुंडगिरी करतात, तेव्हा काही त्यांच्यासमोर गुडघे टेकतात, काही शरणागती पत्करतात. काही हिंमत गमावून सर्वांना सोडून जातात. काहीजण ड्रग्ज घेण्यास सुरुवात करतात, तर काहींना जीवही गमवावा लागतो. या गुंडांच्या टोळीला पराभूत करणे किंवा लढणे अशक्य आहे. सोडा आणि स्वत:साठी यशाचं वेगळं विश्व निर्माण करणारे फार कमी आहेत. आणि तेच खऱ्या आयुष्यातील तारे आहेत.
प्रियांका चोप्राने अलीकडेच डॅक्स शेफर्डसोबत ‘आर्मचेअर एक्सपर्ट’ या पॉडकास्टमध्ये बॉलिवूड सोडण्याविषयी बोलले. प्रियांका म्हणाली होती की, मला बॉलिवूडमध्ये कॉर्नर केलं जात होतं. मला चित्रपटांमध्ये घेतलं जात नव्हतं, मला खूप जणांकडून तक्रारी होत्या. मला इंडस्ट्रीत गेम खेळता येत नाही, इथल्या राजकारणाला मी कंटाळले होते आणि मला ब्रेक हवा होता.”
“मला म्युझिकने जगाच्या दुसऱ्या भागात जाण्याची संधी दिली. जे चित्रपट मला करायचे नव्हते, ते करण्याची मला आवडही नव्हती. पण, मला क्लब आणि लोकांच्या काही गटांना चांगल्या कामासाठी आकर्षित करावं लागायचं, त्यासाठी मेहनत करावी लागायची, तेव्हापर्यंत मी खूप काम केलं. पण म्युझिकची ऑफर आल्यावर मी म्हणाले की खड्ड्यात जा, मी तर अमेरिकेला निघाले.