बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. चित्रपटाच्या यशाचं सेलिब्रेशन करणाऱ्या शाहरुख खानसाठी एक वाईट बातमी आहे. शाहरुखची पत्नी गौरी खानविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गौरीविरोधात उत्तर प्रदेशमधील लखनऊ इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखनऊमध्ये गौरी खानसह ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थिएटरमध्ये सीटखाली सापडलेली चिमुरडी; उंदरांनी कुरतडलेलं शरीर, प्रकाश झा यांनी दत्तक घेतली होती लेक दिशा

गौरी खान तुलसियानी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स लिमिटेडची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. मुंबईतील रहिवासी असलेल्या किरीट जसवंत शाह नावाच्या एका व्यक्तीने लखनऊमधील या प्रकल्पात फ्लॅट खरेदी केला होता. त्याने ८६ लाख रुपये देऊनही आतापर्यंत फ्लॅट मिळाला नसल्याचा दावा त्या व्यक्तीने केला आहे. गौरी खानवर पैसे हडपल्याचा आरोप करत त्याने लखनऊ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे गौरी खानविरुद्ध आयपीसी कलम ४०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Video:…अन् स्टेजवर अवॉर्ड घ्यायला जाताना पायऱ्यांवर पडली अभिनेत्री; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर म्हणाली, “मी माझ्याच…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या व्यक्तीने सीएमडी अनिल कुमार तुलसियानी आणि तुलसियानी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स लिमिटेडचे ​​संचालक महेश तुलसियानी यांच्याविरोधात एफआयआरही दाखल केला आहे. ब्रँड अॅम्बेसेडर गौरी खानने केलेल्या जाहिरातीमुळे प्रभावित होऊन आपण हा फ्लॅट घेतल्याचंही तक्रारकर्त्याने म्हटलं आहे.