८१ वर्षांच्या अमिताभ बच्चन यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा आहे. या वयातही ते चित्रपटांमधील आपल्या भूमिकांसाठी खूप मेहनत घेताना दिसतात. सध्या त्यांचा ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवत आहे, अशातच त्यांच्या फिटनेसची खूप चर्चा होताना दिसतेय. बिग बींचे फिटनेस ट्रेनर वृंदा भट्ट व शिवोहम यांनी अमिताभ बच्चन यांच्या शिस्तप्रिय स्वभावाचं कौतुक केलं आहे.
वृंदा भट्ट आणि शिवोहम हे लोकप्रिय सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर जोडपं आहे. यांनी ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. खरं तर वृंदा मागच्या २४ वर्षांहून जास्त काळापासून बिग बींना फिटनेस ट्रेनिंग देत आहे. निरोगी राहण्यासाठी अमिताभ बच्चन यांचे प्रयत्न आणि इतक्या वर्षात त्यांच्याकडून कोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या, याबाबत वृंदाने सांगितलं आहे.
“हा आमिर खानचा मुलगा आहे?” रिक्षामध्ये आलेल्या जुनैद खानला त्याच्याच सिनेमाच्या स्क्रीनिंगला अडवलं
आपल्या आरोग्यासाठी व्यायाम किती चांगला आहे याची अमिताभ बच्चन यांना चांगली जाणीव आहे आणि म्हणूनच ते व्यायामासाठी वेळ काढतात, असं शिवोहमने सांगितलं. “कधीकधी ते खूप व्यग्र असतात, त्यामुळे त्यांना संध्याकाळी उशिरा व्यायाम करावासा वाटतो. मी त्यांना सांगतो की व्यायामासाठी ही योग्य वेळ नाही. यामुळे त्यांच्या झोपेवर आणि रिकव्हरीवर परिणाम होऊ शकतो. ते बरेचदा व्यायामासाठी वेळ काढतात. सकाळ असो, दुपार असो, संध्याकाळ असो, मीटिंगमध्ये असो वा शूटिंगमध्ये. जेव्हा जमेल तेव्हा ते व्यायामासाठी वेळ काढतात,” असं शिवोहम म्हणाला.
Like Mother like Daughter! अमृता फडणवीस अन् लेक दिविजाचा Same to Same लूक, पाहा ग्लॅमरस फोटो
वृंदाने अमिताभ बच्चन यांच्या बरोबरच्या फिटनेस सेशन्सबद्दल माहिती दिली. त्यांची सेशन्स श्वासोच्छवासाशी संबंधित असतात. यामध्ये श्वासोच्छवासाशी संबंधित व्यायाम, प्राणायाम आणि योगासनांचा समावेश आहे, असं तिने सांगितलं. अमिताभ बच्चन खूप शिस्तप्रिय आहेत. सकाळी सहा वाजताच्या सेशनला त्यांना क्वचितच उशीर होतो. कधी उशीर झाला तर त्यासाठी ते माफी मागतात. अमिताभ बच्चन यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाला पाच-सात मिनिटांसाठी माफी मागण्याची गरज नाही. वेळेचं महत्त्व काय ते मला त्यांच्याकडून शिकायला मिळालं, असं वृंदा सांगते.
Video: अनंत-राधिकाच्या हळदीत अनिल अंबानींच्या सूनेवर खिळल्या नजरा, काय करते क्रिशा शाह? जाणून घ्या
अमिताभ बच्चन सध्या ‘कल्की 2898 एडी’च्या यशाचा आनंद साजरा करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विनने केले आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी ‘अश्वत्थामा’ नावाचे पात्र साकारले आहे. यात बिग बींसह प्रभास, कमल हासन, दीपिका पादुकोण, ब्रह्मानंद या कलाकारांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाशिवाय ते सुपरस्टार रजनीकांत यांच्याबरोबर एका सिनेमात झळकणार आहेत.