मृगदीप सिंग लांबा दिग्दर्शित ‘फुकरे ३’ हा चित्रपट २८ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने विवेक अग्निहोत्रींच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाला मागे टाकलं, तर आता हा चित्रपट किंग खानच्या ‘जवान’लाही मागे टाकताना दिसत आहे. नुकतीच या चित्रपटाने १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे.

फुकरे ३’ ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी दमदार ओपनिंग कलेक्शन केलं. तर यानंतरच्या दिवसांमध्येही या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांचा आलेख हा चढताच आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर आता या चित्रपटाने १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

आणखी वाचा : Video: पंकज त्रिपाठी यांचं खरं नाव माहितेय का? म्हणाले, “मी माझं आडनाव बदललं कारण…”

मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटाने काल ४.३० कोटींची कमाई केली. तर आतापर्यंत या चित्रपटाने देशभरातून ७६.१५ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर काल या चित्रपटाने वर्ल्ड वाईड कमाईचा शंभर कोटींचा आकडा पार केला. या चित्रपटाने काल शाहरुख खानच्या ‘जवान’लाही मागे टाकलं. ‘फुकरे ३’ने काल ४.३० कोटी कमावले तर दुसरीकडे ‘जवान’ने काल २.७५ कोटींची कमाई केली आहे.

हेही वाचा : “निर्मात्यांनी आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं होतं की…”, गिरीजा ओकचा ‘जवान’बद्दल मोठा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या चित्रपटात पुलकित सम्राट, वरुण शर्मा, मनजोत सिंग, रिचा चढ्ढा आणि पंकज त्रिपाठी यांची प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट ‘फुकरे’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे.