‘दामिनी’, ‘घातक’, ‘घायल’, खाकी’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’ ‘अंदाज अपना अपना’सारखे चित्रपट देणारे राजकुमार संतोषी सध्या चर्चेत आहेत, नुकताच त्यांच्या ‘गांधी-गोडसे एक युद्ध या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तसेच ते अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा सनी देओलला घेऊन चित्रपट काढणार आहेत. एका नाटकावर हा चित्रपट आधारित असणार आहे.
८० चं दशक राजकुमार संतोषी यांनी गाजवलं होत सनी देओलला आणि त्यांची जोडी प्रसिद्ध होती, मात्र बरीच वर्ष त्यांनी एकत्र काम केले नव्हते. “जिस लाहोर नाई देखा ओ जमै नाय’ असे चित्रपटाचे नाव असून लेखक असगर वजाहत यांच्या एका नाटकावर आधारित आहे. माध्यमांशी बोलताना ते असं म्हणाले, “असगर आणि मी यावर काम करत आहोत आणि आम्ही त्या चित्रपटाची योजना आखत आहोत. आम्ही मार्चमध्ये चित्रपट सुरू करत आहोत. मी तो बनवत आहे. सनी देओलबरोबर मी २४-२५ वर्षांनी एकत्र काम करत आहे.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
दरम्यान ‘‘गांधी-गोडसे एक युद्ध’ चित्रपटाची पटकथा दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांचं असून ए आर रहमान यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. पुढच्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच २६ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटप्रेमी आणि राजकुमार संतोषी यांचे चाहते या चित्रपटासाठी चांगलेच उत्सुक आहेत..