बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी कायमच आपल्या चित्रपटातून सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ते लवकरच ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची एक झलक पाहायला मिळाली होती. यात मराठमोळा अभिनेता दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर नथुरामची भूमिका साकारत आहे.

या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टीझरच्या सुरवातीलाच गांधी हत्येचा सीन दाखवण्यात आला आहे, त्यानंतर नथुरामला अटक होऊन तो तुरुंगात दाखवण्यात आला आहे. मात्र यात एक वेगळा प्रयोग केला गेला आहे तो म्हणजे नथुराम आणि गांधी यांच्यातील वैचारिक मतभेद दाखवले आहेत. टीझरमध्ये ते एकमेकांसमोर आपले विचार मांडताना दाखवले आहेत. ज्यात नथुराम महात्मा गांधींवर आरोप करतो की, “तुमच्याकडेदेखील एक मोठे हत्यार आहे ते म्हणजे आमरण उपोषण तुम्ही सतत उपोषण करून लोकांना तुमच्यकडे वळवता हीदेखील एक मानसिक हिंसा आहे,” असा आरोप तो करतो. टीझरमध्ये हिंदू मुस्लिम दंगल, पंडित नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सारा वल्लभाई पटेल यांची झलक पाहायला मिळते. टीझरला तितकेच उत्कृष्ट असे पार्श्वसंगीत देण्यात आले आहे.

Amitabh Bachchan look in Kalki 2898 AD
‘शेवटच्या युद्धाची वेळ आली आहे!’ Kalki 2898 AD चा टीझर प्रदर्शित; ‘अश्वत्थामा’च्या दमदार भूमिकेत आहेत अमिताभ बच्चन
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

चित्रपटाचा टिझर नक्कीच उत्कंठावर्धक आहे. या चित्रपटातून दोन मत प्रवाह पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाची पटकथा दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांचं असून ए आर रहमान यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. पुढच्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच २६ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटप्रेमी आणि राजकुमार संतोषी यांचे चाहते या चित्रपटासाठी चांगलेच उत्सुक आहेत.