रितेश व जिनिलीया देशमुख यांची जोडी मनोरंजन विश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. विशेषत: जिनिलीया वैयक्तिक जीवनातील अनेक अपडेट्स तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. अभिनेत्रीने नुकतेच शेअर केलेले लातूरमधील काही फोटो सध्या चर्चेत आले आहेत. यामध्ये चाहत्यांना रितेशची आई, मुलं व पुतणी यांच्यामधील सुंदर बॉण्डिंग पाहायला मिळत आहे.

देशमुख कुटुंबीय सणवाराला किंवा लागोपाठ सुट्ट्या आल्या की, एकत्र लातूरच्या घरी भेटतात. रितेश-जिनिलीया सध्या सहकुटुंब लातूरला गेले आहेत. अभिनेत्रीने लातूरमधून कुटुंबीयांचे काही गोड व Unseen फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

हेही वाचा : “तिचा संघर्ष…”, मराठी अभिनेत्रीची अंकिता लोखंडेसाठी पोस्ट, ‘पवित्र रिश्ता’मध्ये केलंय एकत्र काम, कोण आहे ती?

अभिनेत्रीने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये जिनिलाया तिची मुलं रियान व राहीलबरोबर वेळ घालवत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर, दुसऱ्या एका फोटोमध्ये रितेशचा मुलगा व पुतणी त्याच्या आईबरोबर गप्पा मारत असल्याचं दिसत आहे. जिनिलीया या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिते, “गावच्या खाटेवर बसून आजीमाबरोबर खूप साऱ्या गप्पा आणि गप्पांबरोबर पोहे अजून काय हवं? आमच्या गावच्या आठवणी” रितेशची दोन्ही मुलं त्याच्या आईला ‘आजीमा’ अशी हाक मारतात हे जिनिलीयाने दिलेल्या कॅप्शनवरुन स्पष्ट झालं आहे.

genelia
जिनिलीया देशमुख

हेही वाचा : “नायिका दिसायला उंच, गोरी अन्…”, ऋतुजा बागवेला लोकप्रिय मालिकेतून केलं होतं रिप्लेस; म्हणाली, “वयाच्या २७ व्या वर्षी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
genelia
जिनिलीयाने शेअर केला खास फोटो

दरम्यान, जिनिलीयाने शेअर केलेले हे गोड फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. याशिवाय अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ती शेवटची ‘ट्रायल पीरियड’ चित्रपटात झळकली होती. आता येत्या काही वर्षांत जिनिलीया आणखी काही नवनवीन चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.