Genelia & Riteish Deshmukh : १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. यामुळेच, दरवर्षी १ मे रोजी ‘महाराष्ट्र दिन’ जल्लोषात साजरा केला जातो. यानिमित्ताने आज संपूर्ण राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. याशिवाय मराठी सिनेविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर, काही कलाकारांनी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून नव्या प्रोजेक्ट्सची सुरुवात केली आहे.
मराठीसह बॉलीवूड कलाविश्व गाजवणारा अभिनेता रितेश देशमुखने सुद्धा महाराष्ट्र दिनानिमित्त ( Maharashtra Day ) आपल्या पत्नीसह खास व्हिडीओ शेअर करत सर्व चाहत्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रितेश-जिनिलीयाकडे बॉलीवूडमधील ‘आदर्श जोडी’ म्हणून पाहिलं जातं. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. हे दोघेही प्रत्येक मराठी सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. त्यांचे असंख्य चाहते त्यांना महाराष्ट्राचे दादा-वहिनी म्हणतात. आज महाराष्ट्र दिनानिमित्त प्रेक्षकांना या दोघांनीही मराठमोळ्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र दिनानिमित्त रितेश-जिनिलीयाची खास पोस्ट
जिनिलीया : नमस्कार! आज माहितीये काय आहे?
रितेश : काय?
जिनिलीया : महाराष्ट्र दिन
रितेश : महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना देशमुख परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा
जिनिलीया : जय महाराष्ट्र!
याशिवाय जिनिलीयाने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये “जय जय महाराष्ट्र माझा!!!” असं लिहिलं आहे.
रितेश-जिनिलीयाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “हे दोघंही म्हणूनच सर्वांचे आदर्श आहेत कारण, ते कधीच आपली संस्कृती विसरत नाहीत”, “जय महाराष्ट्र दादा-वहिनी”, “वाह जिनिलीया”, “बेस्ट कपल” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर युजर्सनी दिल्या आहेत.
दरम्यान, रितेश देशमुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, सध्या अभिनेता ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन रितेश स्वत: करतोय आणि या चित्रपटाची निर्मिती जिनिलीया देशमुख करणार आहे. या सिनेमाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. याशिवाय, रितेशचे ‘रेड २’, ‘हाऊसफुल ५’ हे सिनेमे सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.