Riteish And Genelia Deshmukh Funny Video : जिनिलीया व रितेश देशमुख यांची जोडी घराघरांत लोकप्रिय आहे. मनोरंजन विश्वातील आदर्श जोडी म्हणून या दोघांकडे पाहिलं जातं. रितेश-जिनिलीया सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. गेल्या काही दिवसांपासून दोघंही त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. मात्र, शूटिंगमधून वेळात वेळ काढून रितेश-जिनिलीयाने यंदाची दिवाळी आपल्या दोन्ही मुलांसह मुंबईत साजरी केल्याचं पाहायला मिळालं.
दरवर्षी रितेश-जिनिलीया प्रत्येक सणासुदीला लातूरला त्यांच्या मूळ घरी जातात. मात्र, यंदा व्यग्र शेड्युलमुळे या दोघांनी मुंबईत दिवाळी साजरी केली. यादरम्यान, रितेश- जिनिलीयाने एक मजेशीर रील व्हिडीओ शूट केला. हा व्हिडीओ अभिनेत्रीने नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रितेश देशमुख रागात येत असताना त्याचा जिनिलीयाला धक्का लागतो. अभिनेत्री त्याला विचारते इतक्या रागात कुठे निघालास…आणि पुढे काय घडतं वाचा…
रितेश – अरे! बाजूला हो ना…
जिनिलीया – काय झालं? एवढ्या रागात कुठे निघालास?
रितेश – बाजारातून टोमॅटो घेऊन आलो होतो…पण, हे सगळे टोमॅटो खराब आहेत आता परत रिटर्न करायला जातोय… बदलून आणतो.
जिनिलीया – मग विकत घेताना नीट बघून आणायचेस ना ( तो फिर देख के लाने चाहिए थे ना )
रितेश – नीट बघून तर तुलाही आणलं होतं ( देख तो तुम्हे भी लाया था)
रितेशचं उत्तर ऐकून एकच हशा पिकतो. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “भाऊ-वहिनी बेस्ट एकदम”, “तुम्ही दोघे कमाल आहात”, “२ बेस्ट कॉमेडियन्स मस्त”, “दादा-वहिनी इज बॅक…शेवटचे एक्स्प्रेशन्स कमाल होते बरं का”, “तुमचे व्हिडीओ पाहून आपोआप चेहऱ्यावर हसु उमटतं” अशा बऱ्याच प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.
दरम्यान, रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ सिनेमा पुढच्या वर्षी मे ( २०२६ ) महिन्यात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अनेक बॉलीवूड कलाकारांची मांदियाळी असून, हा चित्रपट एकूण ६ भाषांमध्ये रिलीज होईल.
