Girija Oak On Shooting Intimate Scenes : गिरिजा ओक मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. पण, मराठीसही तिने हिंदीतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. गिरिजा येत्या काळात ‘थेरिपी शेरिपी’ (Therapy Sherapy) या वेब सीरिजमधून झळकणार आहे. अशातच तिने या सीरिजसाठी इंटिमेट सीन करतानाचा अनुभव सांगितला आहे.

‘शैतान’, ‘कांतारा चॅप्टर १’, ‘उलझ’ या चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता म्हणजे गुलशबद् (Gulshan Devaiah). गुलशन व गिरिजा ‘थेरिपी शेरिपी’ या सीरिजमधून एकत्र झळकणार आहेत. अशातच अभिनेत्रीने गुलशनबरोबर इंटिमेट सीन करण्याचा अनुभव सांगितला आहे. ‘लल्लन टॉप’ला दिलेल्या मुलाखतीत गिरिजाने याबद्दल सांगितले आहे.

इंटिमेट सीनबद्दल गिरीजा ओकची प्रतिक्रिया

गिरिजाने या सीरिजमध्ये गुलशनबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत तिने गुलशनचे कौतुक केले आहे. त्याच्याबरोबर काम करण्याचा तिचा अनुभव छान असल्याचे तिने म्हटले आहे. गिरिजा याबद्दल म्हणाली, “सीरिज असो किंवा चित्रपट जेव्हा केव्हा इंटिमेट सीन असतो तेव्हा तिथे इंटिमेट को-ऑर्डिनेटर असतात. वातावरण तुम्हाला अनुकूल वाटेल, असंच असतं. सीन करण्यापूर्वी तो कसा करायचा आहे याबद्दल चर्चा केली जाते. पण, इतकं सगळं असतानाही काही वेळा असे सीन करताना अवघडल्यासारखं वाटू शकतं.”

गिरीजाने सांगितला इंटिमेट सीन करण्याचा अनुभव

गिरिजा पुढे म्हणाली, “एकदा कॅमेरा सुरू झाला की, तुम्ही कदाचित अवघडलेल्या परिस्थितीत अडकू शकता की, सीन करीत राहायचं आहे की थांबायचं आहे, हे बरोबर होत आहे की नाही वगैरे.” गिरिजा पुढे म्हणाली, “काही वेळेला असे लोक असतात की, ज्यांच्याबरोबर काम करताना तुम्हाला संकोच वाटत नाही. गुलशन त्यातील एक आहे. त्यानं त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमधून तीन ते चार वेगवेगळ्या उशा आणल्या होत्या आणि मला त्यातली जी आवडेल, ती घ्यायला सांगितली. तो पूर्ण सीन करताना त्यानं निदान १६-१७ वेळा मला विचारलं असेल की, मी ठीक आहे की नाहीये”.

गिरिजा पुढे सहकलाकाराचं कौतुक करीत म्हणाली, “तो पूर्ण सीन करताना त्यानं खूप काळजी घेतली तो होता म्हणून तो सीन करणं सोपं गेलं. तो खूप चांगला माणूस आहे. आज मी याबद्दल असं उघडपणे बोलू शकते. कारण- त्यानं तितक्या आदरपूर्वक काळजी घेत तो सीन केला.”

दरम्यान, गिरिजा व गुलशन यांच्या ‘थेरिपी शेरिपी’ या सीरिजचं दिग्दर्शन सचिन पाठकने केले आहे. त्यामध्ये नेहा धुपियासुद्धा आहे. या सीरिजची रीलिज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.