बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता गोविंदाचा आज वाढदिवस आहे. ‘राजा बाबू’, ‘कूली नं १’, ‘शोला शबनम’, ‘हिरो नं १’ असे एक सो एक हिट चित्रपट देऊन गोविंदाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ९०च्या दशकात हटके स्टाइलने त्याने चाहत्यांना वेड लावलं होतं. गोविंदाच्या गाण्यांची व हूक स्टेपची क्रेझ आजही कायम आहे.

गोविंदाचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. परंतु, गोविंदाने २००८ साली आपल्याच एका चाहत्याच्या कानशिलात लगावली होती. ‘मनी है तो हनी है’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा हा प्रसंग आहे. या शूटिंगदरम्यान गोविंदाने संतोष राय यांच्या कानाखाली मारली होती. संतोष राय अभिनेता होण्याचं स्वप्न घेऊन मायानगरी मुंबईत आले होते. परंतु, या घटनेनंतर आपलं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचा आरोप करत त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत कायदेशीर लढाई सुरुच ठेवण्याचा निर्धारही राय यांनी व्यक्त केला होता.

हेही वाचा>>‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच विकास सावंतला लागली लॉटरी; प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिली चित्रपटाची ऑफर

२०१५ साली याबाबत निकाल देताना  सर्वोच्च न्यायालयाने गोविंदाच्या कृत्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. फिल्मस्टारने सार्वजनिक ठिकाणी मारामारीसारखे कृत्य करू नये, असं म्हणत न्यायालयाने गोविंदाला सुनावले होते. एखादा अभिनेता चित्रपटात जसं वागतो, तसं त्याने आपल्या खऱ्या आयुष्यात वागण्याची गरज नसते, असे न्यायालयाने म्हटलं होतं.

हेही पाहा>> Photos: ‘पठाण’मुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला शाहरुख खान इन्स्टाग्रामवर फक्त ‘या’ सहा जणांना करतो फॉलो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायाधीश टी.एस.ठाकूर यांच्या खंडपीठाने गोविंदाने चाहत्याच्या कानशीलात लगावल्याचा व्हिडिओ न्यायालयात पाहिल्यानंतर त्याच्या कृत्यावर खेद व्यक्त केला होता. गोविंदाला याप्रकरणी न्यायालयाने पाच लाख दंड व संतोष राय यांची माफी मागण्याचे आदेश दिले होते. गोविंदाने त्यानंतर चाहत्याची सशर्त माफी मागण्यास तयार असल्याचं मान्य केलं होतं.