‘लव्ह ८६’, ‘मरते दम तक’, ‘गैरकानूनी’, ‘किस्मत’, ‘राजा बाबू’, ‘हीरो नंबर १’, ‘बनारसी बाबू’, ‘आंटी नंबर १’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांसाठी गोविंदा(Govinda) ओळखला जातो. ९० च्या दशकात अभिनेत्याने विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते. त्याच्या विनोदी भूमिकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्याने चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, अभिनेता आता त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

दुसऱ्या लग्नाबाबत काय म्हणालेला गोविंदा?

गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा(Sunita Ahuja) घटस्फोट घेणार असल्याचा चर्चांना उधाण आले होते. मात्र, गोविंदाच्या वकिलाने सुनीता आहुजाने सहा महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. मात्र, आता त्यांच्यात सर्व काही सुरळीत असून, ते एकत्र राहत असल्याचे स्पष्ट केले आहे. आता या सगळ्यात गोविंदाचे एक जुने वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्याने एका मुलाखतीत ज्योतिषशास्त्र त्याला दुसरे लग्न करण्याचा इशारा देत आहे; पण त्यासाठी सुनीता तयार पाहिजे, असे गोविंदाने म्हटले होते.

स्टारडस्टला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने अभिनेत्री नीलमच्या प्रेमात पडल्याचा खुलासा केला होता. त्याने म्हटलेले की, सुनीताबरोबर लग्न केले. कारण- मी तिला शब्द दिला होता; माझे तिच्यावर प्रेम होते म्हणून लग्न केले नाही. पुढे अभिनेत्याने म्हटलेले, “कोणाला माहीत आहे की, भविष्यात कदाचित मी पुन्हा प्रेमात पडेन. कदाचित ज्या मुलीच्या प्रेमात पडेन, त्या मुलीबरोबर लग्नही करेन. पण, सुनीता त्यासाठी तयार पाहिजे. माझ्या कुंडलीमध्ये दुसऱ्या लग्नाचा योग आहे.”

पुढे गोविंदाने बॉलीवूडमधील त्याला आवडणाऱ्या अभिनेत्रींबद्दल बोलताना म्हटले होते, “मी नशिबावर विश्वास ठेवतो. जे व्हायचे आहे, ते होणार आहे. मला जुही खूप आवडते. दिव्या भारतीही खूप आवडते. मला माहीत आहे की, हे सगळं ऐकल्यानंतर सुनीताला वाईट वाटणार आहे. पण, तिला हे माहीत पाहिजे की, मी स्वत:ला दिव्याप्रति जे आकर्षण वाटतं, त्यापासून रोखलेलं आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गोविंदा व सुनीता आहुजा यांनी १९८७ ला लग्नगाठ बांधली होती. त्यांना टीना व यशवर्धन ही मुले आहेत. सुनीता आहुजा तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती अगदी गोविंदाबद्दलही परखडपणे बोलत असल्याचे विविध मुलाखतींतून पाहायला मिळते. सुनीता आहुजाने अनेकदा गोविंदा ९० च्या काळात अडकल्याचे म्हटले होते. त्याला काळानुसार बदलण्याचा अनेकदा सल्ला दिल्याचेही सुनीता आहुजाने म्हटले होते. आता गोविंदा व सुनीता आहुजा हे जोडपे वेगळे होणार असल्याच्या चर्चांमुळे पुन्हा या सेलिब्रिटी जोडप्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतल्याचे पाहायला मिळाले.