गोविंदा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. ८० आणि ९० च्या काळात गोविंदाने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अभिनेत्यासह गोविंदा एक चांगला डान्सरही आहे. सोशल मीडियावर गोविंदा नेहमी सक्रिय असतो. व्हिडीओ आणि फोटो शेअर करीत तो चाहत्यांच्या संपर्कात असतो. नुकताच गोविंदाने त्याच्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

हेही वाचा- बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांनी घेतली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट; फोटो व व्हिडीओ व्हायरल

नुकताच गोविंदाने रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीत हजेरी लावली होती. या पार्टीत प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवनही सहभागी झाले होते. गोविंदाने आपल्या इन्स्टाग्रामवर डेव्हिड धवन यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. गोविंदाने फोटो शेअर करीत लिहिले “८० आणि ९० च्या दशकात माझ्या दोन पत्नी होत्या. एक सुनीता आणि एक डेव्हिड” गोविंदाची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट केली आहे.

गोविंदा आणि डेव्हिड धवनच्या जोडीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यामध्ये कुली नंबर १, हिरो नंबर १, शोला और शबनम, राजा बाबू, आँखे व पार्टनर यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. या जोडीने १७ चित्रपट एकत्र केले आहेत. पण, काही कारणांस्तव दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार- डेव्हिड धवन यांनी ‘चश्मेबद्दूर’ चित्रपटात ऋषी कपूर यांना घेतले. त्यामुळे गोविंदा डेव्हिड धवनवर नाराज झाला होता.

हेही वाचा- सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी शेवटच्या आरोपीला हायकोर्टाने मंजूर केला जामीन; न्यायमूर्ती म्हणाले, “ही सुनावणी…”

गोविंदाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर सध्या तो अभिनय क्षेत्रापासून लांब आहे. ८० व ९० च्या दशकात गोविंदाचे नाव आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये घेतले जायचे. एकाच वेळी त्याच्याकडे ३० ते ४० चित्रपट असायचे. मात्र, ९० च्या दशकानंतर गोविंदाची जादू ओसरू लागली. ‘पार्टनर’ चित्रपटात सलमान खानच्या मदतीने गोविंदाने बॉलीवूडमध्ये पुन्हा कमबॅक केले; पण त्याचा त्याला जास्त फायदा झाला नाही. काही दिवसांपूर्वी गोविंदा पॉन्झी घोटाळ्यामुळे चर्चेत आला होता.