अभिनेत्री हंसिका मोटवानीच्या लग्नावर आधारित ‘लव्ह, शादी अँड ड्रामा’ ही वेब सीरिज डिज्नी+हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात आली आहे. या सीरिजमधून चाहत्यांना हंसिकाच्या लग्नाच्या तयारीचे अनेक सीन पाहायला मिळत आहेत. अगदी शॉपिंगपासून ते फेऱ्यांपर्यंत सर्वकाही या सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. या शोचा तिसरा भाग शुक्रवारी रिलीज होणार आहे. त्यापूर्वी त्या भागाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यामध्ये तिचा पती सोहेल खातुरियाने तिच्या नावाचा टॅटू काढून तिला सरप्राईज दिल्याचं दिसत आहे.

“किती लाजिरवाणी गोष्ट आहे” स्वतःच्याच देशातील लोकांवर संतापली पाकिस्तानी अभिनेत्री; जावेद अख्तरनाही टोला लगावत म्हणाली…

आगामी एपिसोडमध्ये हंसिका तिचे संगीत आउटफिट निवडताना दिसणार आहे. ती गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान करून दाखवते. यावेळी तिची आई आणि सोहेल आश्चर्यचकित होऊन हसताना दिसतात. याच एपिसोडमध्ये सोहेलने हंसिकाला दिलेलं सरप्राईज देखील पाहायला मिळणार आहे. टॅटू बनवून घेत असताना त्याला वेदना होत असतात, यावेळी तो हंसिकाला व्हिडिओ कॉल करतो आणि सरप्राईज देतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हंसिकाला सुयांची भीती वाटत असते, पण तरीही सोहेल तिच्यासाठी टॅटू बनवून घेतो आणि हा प्रेमाचा विजय असल्याचं म्हणतो. दरम्यान, हंसिका आणि सोहेल यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांच्या एंगेजमेंटची घोषणा केली होती आणि ४ डिसेंबर रोजी जयपूरजवळील मुंडोटा फोर्ट आणि पॅलेस इथं लग्न केलं होतं.