अभिनेत्री अदिती राव हैदरी सध्या ‘हीरामंडी’ सीरिजमुळे चांगलीच चर्चेत आहे. तिने साकारलेल्या ‘बिबोजान’ भूमिकेचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. याआधी अदितीने रणवीर सिंह आणि रणबीर कपूर यांसारख्या बड्या स्टार्सबरोबर काम केलेलं आहे. नुकत्याच ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत अदितीने या बड्या कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

अदिती सांगते, “मी एका लव्हस्टोरी असलेल्या चित्रपटासाठी मणिरत्नमबरोबर काम केलं होतं. त्या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करून मी अवघ्या तीन दिवसांनी संजय लीला भन्साळींच्या सेटवर गेले होते. त्यांच्या सेटवर गेल्यावर मी खऱ्या अर्थाने भारावून गेले. कारण तो भव्य सेट, त्यांचं ते जग सगळंच अद्भूत होतं.”

हेही वाचा : “भलंमोठं कर्ज, बँकेने घर जप्त केलं”, आदिनाथ कोठारेने सांगितला कठीण काळ; म्हणाला, “माझे आई-बाबा…”

अदितीने ‘पद्मावत’साठीचा पहिलाच सीन रणवीर सिंहबरोबर केला होता. अभिनेत्री त्याला इंडस्ट्रीच्या सुरुवातीच्या दिवसापासून ओळखत होती. याबद्दल अदिती म्हणते, “रणवीरने माझ्याकडे पाहिलं आणि तो म्हणाला, आदू तू आज खऱ्या अर्थाने तुझं स्वप्न जगत आहेस बरोबर ना? मी म्हणाले…हो बरोबर आहे तुझं… कारण, तो अनुभव खरोखरच अविश्वसनीय होता”

संजय लीला भन्साळींचं कौतुक करत अदिती पुढे म्हणाली, “मला संजय सर आवडतात. कारण, त्यांचं कामच खूप सुंदर आहे. प्रत्येक भूमिका आणि पात्रावर ते मनापासून प्रेम करतात. तो अनुभव आपल्यासाठी खूपच वेगळा असतो. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं करण्याची त्यांची धडपड असते. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणं हा खरंच खूप वेगळा अनुभव आहे”

हेही वाचा : अमिताभ, जया व रेखा लाँग ड्राइव्हवर जायचे एकत्र; ‘ते’ दोघेही पुढच्या सीटवर बसायचे अन् मागे…

अदितीने याआधी ‘रॉकस्टार’ चित्रपटात रणबीर कपूरबरोबर सुद्धा काम केलेलं आहे. त्याच्याबरोबर काम करण्याच्या अनुभवाबद्दल अभिनेत्री सांगते, “रणबीरबरोबर काम करण्यासाठी मी अक्षरश: वेडी होते. त्यामुळे तो अनुभव आणि त्याच्याबरोबर काम करणं हे माझ्यासाठी स्वप्नवत होतं. तो माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे. रणबीर तुम्हाला कोणतीही गोष्ट अगदी सहज पटवून देऊ शकतो”

हेही वाचा : ‘बिग बॉस मराठी’च्या ५ व्या सीझनची घोषणा! महेश मांजरेकरांच्या जागी दिसणार ‘हा’ मराठमोळा बॉलीवूड सुपरस्टार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी’ सीरिज १ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आली आहे. यामध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, शर्मिन सेगल, रिचा चड्ढा, फरीदा जलाल यांनी महत्त्वाच्या भूमिका साकाल्या आहेत.