बॉलिवूड अभिनेता अरबाज खान मागच्या काही दिवसांपासून त्याचा शो ‘इनविजिबल्स विथ अरबाज खान’मुळे सातत्याने चर्चेत आहे. शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये त्याचे वडील सलीम खान यांनी पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. या शोमध्ये सलीम खान यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले होते. यावेळी त्यांनी हेलनबरोबरच्या लव्हस्टोरीचाही उल्लेख केला होता. आता या शोमध्ये हेलन यांनी सावत्र मुलगा अरबाजबरोबर आपली लव्हस्टोरी शेअर केली आहे. याचबरोबर त्यांनी अनेक माहीत नसलेल्या गोष्टींचा खुलासा केला आहे.

सलमान खान आणि अरबाज खान यांची सावत्र आई म्हणजेच सलीम खान यांची दुसरी पत्नी हेलन एकेकाळी त्यांच्या डान्स व्यतिरिक्त अफेअरमुळे सर्वाधिक चर्चेत राहिल्या होत्या. एकेकाळच्या प्रसिद्ध अभिनेत्री हेलन यांनी आता अरबाज खानच्या ‘इनविजिबल विथ अरबाज खान’ या शोमध्ये त्यांचं खासगी आयुष्य आणि लव्हस्टोरीबद्दल मनमोकळेपणाने चर्चा केली. एवढंच नाही तर सलीम खान यांच्याबरोबरच्या अफेअरमुळे अरबाजची आई सलमा खान यांना किती त्रास सहन करावा लागला हेही त्यांनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- बॉडीगार्डने चाहत्याला दिला धक्का, पण अक्षय कुमारच्या ‘त्या’ कृतीचं होतंय कौतुक

‘इनविजिबल विथ अरबाज खान’च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये हेलन यांनी त्या दिवसांचे किस्से सांगितले, जेव्हा त्या सलीम खान यांच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या. त्या म्हणाल्या, “जेव्हा मी त्यावेळी बँडस्टँडच्या समोरून जात असे. तेव्हा मला माहीत होतं की सलमा खान बाल्कनीमध्ये असणार आहेत आणि त्यांनी मला पाहू नये यासाठी मी डोकं खाली करून माझा चेहरा लपवत असे. जेणेकरून त्यांना वाटावं की कारमध्ये कोणीच नाहीये. मी त्यांचा नेहमीच आदर केला. माझ्यामुळे सलीम त्यांच्या कुटुंबापासून दूर जावेत असं मला कधीच वाटलं नाही.”

आणखी वाचा- दुसऱ्या पत्नीला घरी घेऊन आलेले सलीम खान, काय होती सलमानच्या आईची प्रतिक्रिया?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या शोमध्ये ८७ वर्षीय सलीम खान यांच्याबरोबर असलेल्या नात्याबद्दल हेलन म्हणाल्या, “त्यांच्यामुळे मला चित्रपटांमध्ये भूमिका मिळाल्या होत्या. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र झालो.” दरम्यान सलीम खान यांनी हेलन यांच्याशी १९८० मध्ये लग्न केलं होतं. त्यावेळी सलीम खान विवाहित होते. ८४ वर्षीय हेलन एकेकाळी त्यांच्या दमदार नृत्यासाठी प्रसिद्ध होत्या. त्यावेळी त्यांचं वय ४२ होतं तर सलीम खान ४५ वर्षांचे होते.