Hrithik Roshan’s Girlfriend Saba Azad On Her Breakup With Imaad Shah: अभिनेता हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद आधी नसीरुद्दीन शाह व रत्ना पाठक यांचा मुलगा इमाद शाहबरोबर (Who is Imaad Shah) रिलेशनशिपमध्ये होती. अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर २०२० मध्ये सबा व इमाद शाह यांचे ब्रेकअप झाले. पण त्यांचं ब्रेकअप नात्यातील कटुतेमुळे झालं नव्हतं. दोघांनाही नातं पुढे न्यायचं नव्हतं व करिअरवर लक्ष केंद्रित करायचं होतं.

द हॉलिवूड रिपोर्टर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत, सबा आझाद आणि इमाद शाह यांनी त्यांच्या नात्यातील विविध पैलूंबद्दल सांगितलं. “आमचं ब्रेकअप झाल्यावर बऱ्याच लोकांनी आम्हाला सुचवलं की आम्ही काही काळ भेटू नये. पण खरं तर आम्ही नातं संपवलं तेव्हा फार दुःखी नव्हतो,” असं इमाद म्हणाला.

ब्रेकअपनंतरही प्रेम असतं – सबा आझाद

ब्रेकअपनंतरही त्या व्यक्तीबद्दल प्रेम असतंच, असं सबाने सांगितलं. “जोपर्यंत कोणी तुमच्याशी वाईट वागत नाही, तोपर्यंत त्याच्यावर प्रेम करणं कसं थांबवायचं? उलट त्या प्रेमाचं वेगळ्याच गोष्टीत रुपांतर होतं. एक सुंदर मैत्री, ज्यात तुम्ही नेहमीच एकमेकांच्या पाठीशी असता,” असं सबा म्हणाली.

सबाने इमाद अजूनही कुटुंबासारखा आहे, असं वक्तव्य केलं. “आम्ही कुटुंबासारखे आहोत. मी इमादला माझ्या आयुष्यातून कधीच बाहेर काढू शकणार नव्हते. ब्रेकअपनंतर आम्ही कायम मित्र राहू, मित्र म्हणून एकत्र मोठे होऊ असं ठरवलं होतं,” असं सबाने सांगितलं.

saba Azad On Her Breakup With Imaad Shah
सबा आझाद व इमाद शाह (फोटो – सोशल मीडिया)

ब्रेकअपनंतर मित्र झालो – सबा आझाद

ब्रेकअपनंतर इमाद व सबाचं नातं सुधारलं. “आम्ही अनेकदा गमतीत म्हणतो की ब्रेकअप झाल्यानंतर आमचं नातं चांगलं झालं,” असं इमाद म्हणाला. सबाने यावर सहमती दर्शवली. “खरंच खूप चांगलं झालं. आम्ही एकमेकांवर कमी टीका करू लागलो आणि चांगले मित्र झालो,” असं सबाने नमूद केलं.

सबा आझाद सध्या अभिनेता हृतिक रोशनला डेट करत आहे. त्यांनी २०२२ मध्ये करण जोहरच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीत त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. हृतिकला एक्स पत्नी सुझान खानबरोबर दोन मुलं आहेत.