हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘फायटर’ या चित्रपटाला चाहते, समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी २२.५ कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली आहे. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये हळूहळू वाढ होत आहे. ‘फायटर’ या चित्रपटाने शनिवारी २८ कोटींहून अधिक कमाई केल्याचं स्पष्ट झालं आहे.

आत्तापर्यंत या चित्रपटाने जगभरात १३७.५ कोटींची कमाई केली आहे. तर भारतात याने ११८ कोटींची कमाई करत १०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री घेतली आहे. चित्रपटातील हृतिक आणि दीपिका यांच्या केमिस्ट्रीवरुन वाद निर्माण झाला अन् चित्रपटातील काही बोल्ड दृश्य हटवायला लागली होती. त्याप्रमाणेच हा चित्रपट पाकिस्तान विरोधी असल्याचाही आरोप यावर लागला होता. यामुळेच हा चित्रपट काही अरब राष्ट्रांमध्ये प्रदर्शित करता आला नाही.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

आणखी वाचा : “मी कायम स्वतःला…” ‘फायटर’च्या सीक्वलबद्दल दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांचा मोठा खुलासा

पाकिस्तानण विरोधी भावना या चित्रपटातून मांडल्या असल्याने युएई आणि इतर काही अरब तसेच आखाती देशांमध्ये ‘फायटर’वर बंदी घालण्यात आली. हीच गोष्ट आता महागात पडल्याचं वृत्त समोर आलं आहे. ‘एम९न्यूज’ या पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार या देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ न शकल्याने निर्माते व सिद्धार्थ आनंद यांना ६० ते ८० कोटींचे नुकसान झाले आहे. भारतीय चित्रपटांना त्या देशात प्रचंड मागणी आहे पण ‘फायटर’ तिथे प्रदर्शित होऊ न शकल्याने त्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरही त्याचा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे.

सिद्धार्थ आनंद यांच्या ‘वॉर’ आणि ‘पठाण’च्या तुलनेत या चित्रपटाची कमाई कमी झाली आहे, पण एकंदर हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. गुरुवार २५ जानेवारी रोजी ‘फायटर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, अनिल कपूर यांच्यासह अक्षय ओबेरॉय, करण सिंग ग्रोव्हर आणि संजीदा शेख यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटात हृतिक रोशन व दीपिका पदूकोण ही जोडी प्रथमच पडद्यावर दिसली अन् प्रेक्षकांना ती पसंतही पडली. तसेच चित्रपटातील काही बोल्ड सीन्सवर सेन्सॉरने कात्री चालवल्याने हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.