१९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘हम आपके हैं कौन’ चित्रपट प्रचंड गाजला. सूरज बडजात्या दिग्दर्शित या चित्रपटाने त्या काळात बक्कळ कमाई केली. १९९४ साली सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ‘हम आपके है कौन’ होता. या चित्रपटातील सलमान खानच्या प्रेम आणि माधुरी दीक्षितच्या निशा भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. तसंच चित्रपटातील गाण्यांनी तर प्रेक्षकांना वेडचं लावलं. आजही ‘हम आपके हैं कौन’ चित्रपट तितक्याच आवडीने पाहिला जातो. याच सुपरहिट चित्रपटातील रीटा सध्या काय करते तुम्हाला माहितीये का? तर, जाणून घ्या…

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत, ज्यांनी अभिनय क्षेत्राला रामराम केला आहे. काहींनी अपयशामुळे तर काहींना वैयक्तिक आयुष्यावर लक्ष देण्यासाठी अभिनय क्षेत्र सोडलं आहे. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री साहिला चड्ढा. ‘हम आपके है कौन’ चित्रपटात साहिला चड्ढाने रिटाची भूमिका साकारली होती, जी चांगलीच गाजली.

१९८५ साली साहिला चड्ढाने ‘आय लव्ह यू’ चित्रपटातून आपल्या अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी ती ‘मिस इंडिया’ विजेती झाली होती. १९८५ ते २०१४ पर्यंत साहिलाने ‘दौलत की जंग’, ‘बोल राधा बोल’, ‘अब इंसाफ होगा’, ‘नमक’, ‘आंटी नंबर १’ यांसारख्या बऱ्याच चित्रपटात काम केलं. साहिलाने अनेक मोठ्या चित्रपटात काम केलं, पण तिला कधी मुख्य भूमिका मिळाली नाही. तिच्या अभिनय क्षेत्रातील करिअरमधील सुपरहिट चित्रपट म्हणजे ‘हम आपके हैं कौन’. या चित्रपटातदेखील तिने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती.

साहिलाचा शेवटचा चित्रपट ‘तुलसी’ होता; जो २००८मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये मनीषा कोइराला आणि इरफान खान मुख्य भूमिकेत झळकले होते. त्यानंतर २०१४मध्ये ती एका शॉर्ट फिल्ममध्ये पाहायला मिळाली. ५० चित्रपट केल्यानंतर साहिलाने बॉलीवूडच्या झगमगत्या दुनियेतून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला.

View this post on Instagram

A post shared by Sahila Chaddha (@sahilachaddha)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे साहिला चड्ढाने अभिनेता निमाई बालीबरोबर लग्न केलं आणि वैवाहिक आयुष्यात ती व्यग्र झाली. दोघांना एक मुलगी आहे. साहिला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. माहितीनुसार, अभिनेत्रीने स्वतःचं प्रोडक्शन हाउस सुरू केलं असून तिथेच काम करत आहे. या प्रोडक्शन हाउसच्या माध्यमातून वेब सीरिज आणि मालिकांची निर्मिती केली जात आहे.