अभिनेता शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला ‘पठाण’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं वादात सापडलं होतं. या गाण्यात दीपिका पादुकोणने भगव्या रंगाची बिकीनी परिधान केल्याने वाद निर्माण झाला होता. या वादावर अनेक भाजपा नेत्यांनी प्रतिक्रिया देत आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रपटांबद्दल भाष्य करणाऱ्या भाजपा नेत्यांना सल्ला दिला. या सल्ल्याचं इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष इंडियन अशोक पंडित यांनी स्वागत केलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना ते म्हणाले, “पंतप्रधान जर आपल्याच लोकांची कानउघाडणी करत असतील आणि त्यांना चित्रपट इंडस्ट्री, जे त्यांचे क्षेत्र नाही, त्याबद्दल फक्त प्रसिद्धीसाठी बोलू नका आणि गप्प राहा, असं सांगत असतील, तर ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. कारण देशाचे पंतप्रधान आमच्याबरोबर आहेत, असा आत्मविश्वास आम्हाला त्यातून मिळतो. ही गोष्ट फक्त राजकारण्यांनाच नाही तर मीडियातील लोकांना आणि इंडस्ट्रीचा भाग असून त्याविरोधात बोलणाऱ्या लोकांनाही लागू पडते,” असं अशोक पंडित यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iftda ashoke pandit welcomes modi warning against unnecessary comments on movies to bjp leaders amid pathaan protests hrc
First published on: 19-01-2023 at 15:35 IST