काही अभिनेते आपल्या अभिनयासाठी, तर काहीजण स्टाईलसाठी ओळखले जातात. अभिनेता सोनू सूद त्याच्या अभिनयापेक्षा आता सामाजिक कार्यासाठी ओळखला जातो. संपूर्ण करोना काळात त्याने ज्याप्रकारे देशभरातील लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत केली त्याचं सर्वत्र कौतुक झालं आहे. सोनूने त्याकाळात स्वखर्चाने लाखो कामगारांना सुखरुप त्यांच्या घरी पोहचवले. त्याच्या या समाजकार्याचे सर्वत्र कौतुक झाले.

सोनूने नुकताच लोकलने प्रवास केला होता. त्याच्या या कृतीचे नेटकऱ्यांनी कौतूक केले होते. सोनू सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो त्याच्या आयुष्यातील छोट्या मोठ्या घडामोडी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करू शकतो. नुकतंच त्याने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्याने एका मोठ्या थाळीचा फोटो शेअर केला आहे.

आणखी वाचा : ‘पठाण’नंतर ‘टायगर ३’साठी सलमान शाहरुख सज्ज; लवकरच चित्रीत केला जाणार खास सीन

हैद्राबाद येथील गिस्मत या अरेबिक हॉटेलमध्ये सध्या एक २० लोकांसाठी एक खास मटण थाळी दिली जाते. याच थाळीला अभिनेता सोनू सूदचं नाव देण्यात आलं आहे. याबद्दल तो या पोस्टमध्ये म्हणला, “‘भारतातील सर्वात मोठ्या थाळीला माझं नाव देण्यात आलं आहे. मी एक शाकाहारी माणूस असून माझ्यासारख्या कमी आहार असलेल्या माणसाचं नाव २० व्यक्ती खाऊ शकतील अशा थाळीला दिले जाऊ शकते, असा मी विचारच केला नव्हता.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनूची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. नेटकऱ्यांनी त्याच्या या फोटोवर कॉमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे. हिंदी चित्रपटसृष्टीशिवाय सोनूने तमिळ, तेलगू, कन्नड आणि पंजबी या भाषांमधील चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. तसेच ‘जोधा अकबर’, ‘सिंह इज किंग’, ‘मिशन मुंबई’, दबंग’सारख्या चित्रपटांमध्ये सोनू सूदने महत्वाची भूमिका साकारली.