इंडियन प्रीमियर लीगच्या १६ व्या हंगामाची सध्या धामधूम पाहायला मिळत आहे. आयपीएलमध्ये यंदाच्या हंगामात एकापेक्षा एक रंगतदार सामने पाहायला मिळत आहेत. आज कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना सुरु आहे. याच निमित्ताने अभिनेता शाहरुख खानने ईडन गार्डन्सच्या मैदानात हजेरी लावत टीमला प्रोत्साहन दिले. याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.

आयपीएलचा ९ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सुरु आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या सामना पाहण्यासाठी काही तासांपूर्वी शाहरुख खान कोलकातासाठी रवाना झाला. त्याच्याबरोबर त्याची मुलगी सुहाना खानही पाहायला मिळाली. त्यानंतर आता सामनादरम्यानचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत.
आणखी वाचा : Video : …अन् भर मैदानात अरिजित सिंह पडला एम.एस धोनीच्या पाया, पाहा नेमकं काय घडलं?

नुकतंच सोशल मीडियावर शाहरुख खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात शाहरुखने काळ्या रंगाची हुडी आणि पँट परिधान केल्याचे दिसत आहे. त्यात तो कॅमेऱ्याकडे पाहून हात दाखवत असल्याचे दिसत आहे. त्याबरोबर त्याने चाहत्यांना फ्लाईंग किसही दिले.

विशेष म्हणजे सामन्यादरम्यान शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘झूमे जो पठाण’ हे गाणे लागलं होतं. त्यावरही शाहरुख थिरकताना दिसला. यावेळी शाहरुखने या गाण्यातील त्याची हुकस्टेप चाहत्यांना करुन दाखवली. ‘पठाण’च्या गाण्यावर नाचतानाचा त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

आणखी वाचा : KKR vs RCB : ‘या’ मराठमोळ्या खेळाडूने ईडन गार्डनमध्ये रचला इतिहास; RCB विरोधात ठोकलं IPL मधील पहिलं अर्धशतक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान शाहरुख खान हा क्रिकेट प्रेमी आहे. आयपीएलच्या प्रत्येक हंगामावेळी तो मैदानात हजेरी लावतो. कोलकाता नाईट रायडर्स या त्याच्या मालकीच्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी तो अनेकदा हजेरी लावताना दिसतो. सध्या शाहरुख हा त्याच्या ‘जवान’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. पण त्यातही त्याने वेळात वेळ काढून आजच्या सामन्याला हजेरी लावली आहे. त्यामुळे त्याचे चाहते त्याचं कौतुक करताना दिसत आहेत.