बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी आयरा खान ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या निर्णयांमुळे तिच्या फोटोंमुळे तिला अनेकदा ट्रोल केलं जातं. पण आता अचानक ती चर्चेत आली आहे. तिचे काही जुने बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंवर तिला ट्रोल करणाऱ्या सगळ्या ट्रोलर्सना तिने एका हटके शैलित उत्तर दिलेलं दिसत आहे.

आयरा ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर सक्रिय राहून ती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या छोट्या मोठ्या घडामोडी शेअर करत असते. बऱ्याच जातीचे बोल्ड फोटो पोस्ट करते ज्यामुळे तिला टीकेला सामोरं जावं लागतं. पण मध्यंतरी तिच्या फोटोंवर टीका करणाऱ्या अशा सर्वांना तिने आणखीन फोटो पोस्ट करूनच उत्तर दिलं होतं, जी पोस्ट आयात पुन्हा व्हायरल होऊ लागली आहे.

आणखी वाचा : “वो मुझे भी नहीं छोड़ेंगे…” सुशांत सिंह राजपूतबरोबरचा फोटो पोस्ट करत विवेक अग्निहोत्री यांनी केलेलं ‘ते’ ट्वीट चर्चेत

हेही वाचा : Video: लेकीच्या साखरपुड्यात आमिर खानचा ‘पापा कहते हैं’ गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयराने काही दिवसांपूर्वी तिचा वाढदिवस साजरा केला होता. यावेळी तिने बिकिनी घातली होती आणि ते फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. हा तिचा बोल्ड अंदाज पाहून नेटकरांनी तिच्यावर चांगलाच निशाणा साधला होता. आता त्या सगळ्या ट्रोलर्सना प्रत्युत्तर म्हणून तिने तिच्या वाढदिवसाचे आणखीन काही बोल्ड फोटो पोस्ट केले. हे फोटो पोस्ट करत तिने लिहिलं, “तुम्हा सगळ्यांचं माझ्या वाढदिवसाच्या फोटोंवर नाराजी व्यक्त करून आणि मला ट्रोल करून झालं असेल तर हे माझे आणखी काही फोटो…” तिच्या या जुन्या फोटोंनी आणि तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं. आयराचा हा बोल्ड अंदाज पाहून नेटकरी पुन्हा एकदा तिला ट्रोल करू लागले.