अनन्या पांडे गेले काही दिवस आदित्य रॉय कपूरबरोबर बऱ्याच ठिकाणी दिसली. काही इवेंट, एयरपोर्ट तसेच वेकेशन्स अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे जोडपं एकत्र दिसलं तेव्हापासून यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. आता अनन्याबरोबर ब्रेक अप झाल्यानंतर अभिनेता ईशान खट्टर पुन्हा एकदा प्रेमात पडल्याची चर्चा होत आहे.

अनन्यापासून वेगळं झाल्यावर ईशानचं नाव एका मलेशियन मॉडेलबरोबर जोडलं गेलं. काही दिवसांपूर्वी ईशान एका मिस्ट्री गर्लबरोबर दिसला होता तेव्हापासूनच त्याचे चाहते ती मुलगी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होते, आता ती मुलगी कोण आहे हे समोर आले आहे.

आणखी वाचा : देओल कुटुंबावर पसरली शोककळा; कुटुंबातील अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन

मीडिया रीपोर्टनुसार ईशान मलेशियामधील एका मॉडेल व टेलिव्हिजन अभिनेत्रीला डेट करत आहे. तिचं नाव चांदनी बेन्झ आहे. ‘इ टाईम्स’ला मिळालेल्या माहितीनुसार दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. इतकंच नव्हे तर ईशानने तिची ओळख त्याच्या मित्रांमध्येसुद्धा करून दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Chandni Bainz ? (@chandnibainz)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोघे एकमेकांना जूनपासून डेट करत असल्याचं सांगितलं जात आहे. चांदनी बेन्झ ही मलेशियातील क्वालालंपूरची आहे. सिंगापूरमधील ‘माय मदर्स स्टोरी’ या टेलिव्हिजन शोमुळे ती लोकप्रिय झाली. सध्या चांदनी भारतात असून मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावत आहे. ती बॉलिवूडमध्ये येण्याची संधी शोधत आहे. तिला बॉलीवूडमध्ये आपलं करियर सेट करायचं आहे.