Anant Ambani and Radhika Merchant Wedding: गेल्या कित्येक महिन्यांपासून ज्या क्षणाची चर्चा सुरू होती तो क्षण अखेर आला आहे. ते म्हणजे अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा. नीता-मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये (NMACC) या शाही लग्नसोहळ्याला सुरुवात झाली असून पाहुणे मंडळी आता लग्नस्थळी हळूहळू पोहोचत आहेत. याचे व्हिडीओ सध्या व्हायरल झाले आहेत. अंबानी कुटुंबासह, काही बॉलीवूड सेलिब्रिटी आणि परदेशी पाहुणे लग्नस्थळी पोहोचले आहेत. यावेळी ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हटके लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अनंत अंबानी आज एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सीईओ वीरेन मर्चंट आणि उद्योजिक शैला मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट हिच्याशी लग्नबंधनात अडकणार आहे. दोघांच्या लग्नाचे विधी सुरू होण्यासाठी अवघे काही तास बाकी राहिले आहेत. त्यामुळे सध्या लग्नस्थळी पाहुण्यांची लगबग पाहायला मिळत आहे. ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ नेहमी प्रमाणे छोटंसं रोपटं घेऊन अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याला पोहोचले आहेत. यावेळी जॅकी श्रॉफ पांढऱ्या रंगाचं धोतर, त्यावर शेरवानी आणि सुंदर डिझाइन असलेल्या पहाडी टोपीमध्ये पाहायला मिळाले. त्यांच्या हा हटके लूक चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Anant Ambani Wedding: अनंत-राधिकाच्या लग्नासाठी जॉन सीनाचा खास भारतीय पारंपरिक लूक, पाहा व्हिडीओ

अनंत-राधिकाच्या लग्नातील जॅकी श्रॉफ यांचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘वरिंदर चावला’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, हातात छोटंसं रोपटं घेऊन आपल्या हटके लूकमध्ये जॅकी श्रॉफ यांची एन्ट्री पाहायला मिळत आहे. फोटोसाठी पोज दिल्यानंतर जॅकी श्रॉफ पापराझींना भेटून त्यांना हात मिळवताना दिसत आहेत.

हेही वाचा – Video : अखेर तो क्षण आलाच! लग्नमंडपात अंबानी कुटुंबाची रॉयल एन्ट्री, मुलाच्या लग्नात वरमाई नीता अंबानींचा उत्साह

हेही वाचा – Isha Ambani Lehenga: शिव शक्ती पूजेला ईशा अंबानीने परिधान केलेला लेहेंगा तयार करायला लागले ४ हजार तास! जाणून घ्या खास वैशिष्ट्य…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही लग्नसोहळ्यानंतर १३ जुलैला संध्याकाळी आशीर्वाद समारंभ होणार आहे. या समारंभाला मोजके पाहुणे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर १४ जुलैला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे.