जॅकी श्रॉफ हे 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी सुभाष घई यांच्या ‘हिरो’ चित्रपटातून बॉलिवूडमधून पदार्पण केलं होतं. जॅकी यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या सर्व यशाचं श्रेय ‘हिरो’ चित्रपटाला दिलं. तो चित्रपट नसता तर आज मी नसतो, असं जॅकी श्रॉफ म्हणाले.

जॅकी याचं मुळ नाव जयकिशन श्रॉफ होतं. त्यांना त्यांचे चाहते प्रेमाने जग्गुदादा म्हणतात. या मुलाखतीत बोलताना त्यांनी ते जयकिशन श्रॉफचे जॅकी श्रॉफ कसे बनले, याबाबतही खुलासा केला. जॅकी श्रॉफ यांचा जन्म मुंबईच्या चाळीत झाला होता. त्यांचं तरुणपणही तिथेच गेलं. त्यांचा चाळीपासूनचा ते बॉलिवूड सुपरस्टार होण्यापर्यंतचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

Video: बॉलिवूड पदार्पणाचा आनंद गगनात मावेना, बार काउंटरवर चढून बेभान होऊन नाचली ‘ही’ मराठी अभिनेत्री

‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत जॅकी श्रॉफ म्हणाले, “माझी आई मला जग्गू म्हणायची आणि माझे मित्र मला जग्गू बाबा म्हणायचे. तर, माझे वडील मला जयकिशन म्हणायचे. काही लोक मला जय म्हणायचे, तर काही किशन म्हणून हाक मारायचे. माझी खूप नावं आहेत, तुम्ही मला कोणत्याही नावाने हाक मारा, पण प्रेमाने हाक मारा इतकंच.”

लग्नानंतर रात्रीच राणादा पाठकबाईंना कॉफी डेटला घेऊन गेला अन्…; फोटो व्हायरल

तुम्ही जॅकी म्हणून कसे ओळखले जाऊ लागलात, याबद्दल विचारलं असता ते म्हणाले, “मी शाळेत असताना माझा एक मित्र होता. तो हाँग काँग की दुबईहून आला होता. त्याला माझं जयकिशन नाव खूप मोठं वाटत होतं. त्यामुळे माझ्या नावाशी थोडं खेळायला हवं असं त्याला वाटलं. त्याने मला जय-की या नावाने हाक मारायला सुरुवात केली. नंतर ते जय-कीचं जॅकी झालं. माझी नावं बदलत राहतात, पण मी मात्र अजुनही तोच आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जॅकी श्रॉफ शेवटचे कतरिना कैफ, इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्याबरोबर ‘फोन भूत’ चित्रपटात दिसले होते. ‘लाईफ्स गूड’ हा त्यांचा आगामी चित्रपट आहे.