जान्हवी कपूरने आई श्रीदेवी यांच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. विविध बॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका साकारत जान्हवीने अल्पवधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. स्टार किड्सच्या यादीमध्येही जान्हवीचं नाव आजही टॉपला घेतलं जातं. आता नुकतंच जान्हवीच्या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. यात एक मराठी अभिनेताही झळकणार आहे. नुकतंच त्याची झलक समोर आली आहे.

जान्हवी कपूरच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘उलझ’ असे आहे. या चित्रपटात ती भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट देशभक्तीवर आधारित असणार आहे. येत्या महिन्याच्या अखेरीस या चित्रपटाचे शूटींग सुरु होणार आहे.
आणखी वाचा : राखी सावंतचा भाऊ राकेशला मुंबई पोलिसांकडून अटक, २२ मे पर्यंत सुनावली न्यायालयीन कोठडी

या चित्रपटात जान्हवीबरोबरच गुलशन देवैया आणि रोशन मॅथ्यू मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. त्याशिवाय या चित्रपटात राजेश तैलंग, मीयांग चांग, ​​सचिन खेडेकर, राजेंद्र गुप्ता आणि जितेंद्र जोशी हे देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.

आणखी वाचा : “‘द केरला स्टोरी’ला मराठी सिनेसृष्टी पाठिंबा का देत नाही?” अमृता खानविलकर म्हणाली “कारण ‘महाराष्ट्र शाहीर’…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुधांशू सारिया या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाशिवाय जान्हवी कपूर ‘मिस्टर अँड मिसेस माही’ आणि ‘बवाल’ या चित्रपटांमध्येही दिसणार आहे. याशिवाय ती ज्युनियर एनटीआरबरोबर ‘एनटीआर 30’ हा चित्रपटही करत आहे.