बॉलिवूडमधील ज्येष्ठ गीतकार व पटकथाकार जावेद अख्तर यांनी अलीकडेच पाकिस्तानमधील लाहोर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘फैज फेस्टिवल २०२३’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी २६/११च्या गुन्हेगारांचा मुद्दा अधोरेखित केला. या कार्यक्रमात त्यांनी पाकिस्तानला दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल टोला लगावला होता. त्यानंतर कंगना रणौतने जावेद अख्तर यांचं कौतुक केलं होतं. त्या कौतुकावर जावेद अख्तर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले होते जावेद अख्तर?

“आपण एकमेकांना दोष देणं थांबवलं पाहिजे, त्यामुळे कोणतीही समस्या सुटणार नाही. एकूणच सध्या जे वातावरण तापलं आहे ते कमी व्हायला पाहिजे. आम्ही मुंबईकर आहोत, आम्ही पाहिलं आहे तेव्हा मुंबईवर कशापद्धतीने हल्ला झाला होता. ती लोकं नॉर्वे किंवा इजिप्तमधून आलेले नव्हते. ही लोक अजूनही तुमच्या देशात मोकाट फिरत आहेत आणि ही खदखद एखाद्या भारतीयाच्या मनात असेल तर त्याचं तुम्ही वाईट वाटून घ्यायला नको,” असं जावेद अख्तर त्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते.

“तिला १००० पुरुषांबरोबर…” अयोध्येच्या महंतांची स्वरा भास्कर-फहाद अहमदच्या लग्नावर टीका

जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावर कंगनाची प्रतिक्रिया

कंगना रणौतने कार्यक्रमातील व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत, “जेव्हा मी जावेद साहेबांच्या कविता ऐकते तेव्हा असं वाटतं की कशी सरस्वती मातेने यांच्यावर एवढी कृपा केली आहे. पण पाहा काहीतरी प्रामाणिकपणा असतोच माणसात. जय हिंद जावेद अख्तर साहेब. घरात घुसून मारलात. हाहाहा” असं म्हटलं होतं.

अक्षय कुमारने मोडला तीन मिनिटांत सर्वाधिक सेल्फींचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड; ‘इतके’ सेल्फी काढत म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंगनाच्या कौतुकावर जावेद अख्तर काय म्हणाले?

“कंगनाच्या कौतुकाने मला काही फरक पडत नाही. काही दिवसांत ती पुन्हा जुन्या झोनमध्ये परत येईल. काळजी करू नका हे काही काळासाठीच आहे. खरं तर मी कंगनाला फार महत्त्व देत नाही. त्यामुळे तिने तिच्या वक्तव्यालाही महत्त्वाचं समजत नाही. ती बोलली ते विसरून जा आणि पुढे चला” असं जावेद अख्तर म्हणाले.