scorecardresearch

Premium

“तिला १००० पुरुषांबरोबर…” अयोध्येच्या महंतांची स्वरा भास्कर-फहाद अहमदच्या लग्नावर टीका

स्वराच्या आंतरधर्मीय लग्नानंतर अयोध्येचे महंत राजू दास यांनी स्वरावर खालच्या पातळीवरील टीका केली आहे.

mahant raju das on swara bhasker
अयोध्येचे महंत राजू दास यांनी स्वरा भास्करला लग्नावरून चांगलंच सुनावलं आहे.

अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादीचा नेता फहाद अहमदशी लग्न केलं आहे. स्वराच्या आंतरधर्मीय लग्नानंतर तिच्यावर टीका केली जात आहे. त्याच्याशी लग्न करताना तू घरातला फ्रीज पाहिला होतास का, अशी टीका साध्वी प्राचींनी श्रद्धा वालकरचा उल्लेख करत केली होती. अयोध्येचे महंत राजू दास यांनी स्वरा भास्करला लग्नावरून चांगलंच सुनावलं आहे.

“फ्रीजमध्ये श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे…” स्वरा भास्करने फहाद अहमदशी लग्न केल्याने साध्वी प्राचीचा संताप

Shinde Fadnavis Pawar
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा…
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?
mrinal kulkarni virajas and shivani
“शिवानी आणि विराजस, तुम्ही दोघेही…,” मृणाल कुलकर्णींनी व्यक्त केला आनंद, जाणून घ्या खास कारण

“स्वरा भास्कर जर एक सशक्त महिला असेल तर तिने लग्नच केले नसावे. पण जर तिला १००० पुरुषांबरोबर रात्री घालवायच्या असतील तर तिचं अभिनंदन. कारण तिने अशा समाजातील व्यक्तीशी लग्न केलं आहे, जिथे भाऊ-बहिणी लग्न करतात आणि नंतर तलाक, तलाक, तलाक करतात,” राजू दास म्हणाले.

Video: “हे असले चाळे…” ‘त्या’ व्हिडीओमुळे ‘फँड्री’ फेम राजेश्वरी खरात ट्रोल

“स्वरा भास्करने उघडपणे इंशा अल्लाह आणि भारत तेरे टुकडे होंगे असं म्हटलं होत. १० दिवसांपूर्वी भाऊ म्हणून संबोधित केलेल्या व्यक्तीशी तिने नोंदणी पद्धतीने लग्न केले आणि लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले,” असंही अयोध्याचे महंत राजू दास म्हणाले.

साजिद खान Bigg Boss 16 मधील ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट? नाव वाचून व्हाल चकित

स्वरा व फहादने जानेवारी महिन्यात नोंदणी पद्धतीने लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांनी १६ फेब्रुवारीला साखरपुडा केला. आता मार्च महिन्यात ते थाटामाटात लग्न करणार आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ayodhya mahant raju das reaction on swara bhasker wedding with fahad ahmad hrc

First published on: 23-02-2023 at 08:50 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×