‘तबलिगी जमात’चे मौलाना तौकीर अहमद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना इस्लाम धर्म स्वीकारण्याचे निमंत्रण दिले आहे. हे दोघे मुस्लिम झाले, तर खूप गोष्टी सुधारतील, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूडमध्ये मुस्लीम कलाकारांशी भेदभाव केला जातो का? हुमा कुरेशी म्हणाली, “आजही…”

“मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना इस्लाम धर्म स्वीकारण्याचे निमंत्रण देतोय. हे दोघे मुस्लिम झाले, तर खूप गोष्टी सुधारतील. देशभरात २०१४ पासून आतापर्यंत २० लाख मुस्लिम वाढले आहेत. आमचा शरिया कायदा लागू व्हावा, या प्रयत्नात आम्ही आहोत. येत्या काळात अफगाणिस्तानप्रमाणेच भारतातही तो लागू होईल,” असे या मौलानाने म्हटले होते. हा व्हिडीओ पाहून जावेद अख्तर यांनी संताप व्यक्त केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘कोण आहे हा जोकर? या मूर्खाला त्याच्या कुटुंबीयांनी अजून वेड्यांच्या रुग्णालयात का पाठवलं नाही,’ असं ट्वीट जावेद अख्तर यांनी केलं आहे.

javed akhtar tweet
जावेद अख्तर यांचे ट्वीट

दरम्यान, मौलाना तौकीर अहमद यांनी ‘टाइम्स नाऊ नवभारत’शी संवाद साधताना या सर्व गोष्टी म्हटल्या होत्या. जावेद अख्तर यांनी ट्वीट केल्यानंतर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींना या मौलानाला इतकं महत्त्व देण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. तर, अनेकांनी तो पैसे घेऊन अशा गोष्टी बोलत असल्याची टीका केली आहे.