नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ चित्रपट २०२२ साली प्रदर्शित झाला होता. विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘झुंड’ चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. तसंच या चित्रपटातून बरेच नवोदित कलाकार पाहायला मिळाले. यापैकी एक म्हणजे अंकुश गेडाम. अंकुशला ‘झुंड’ चित्रपटासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटातील अंकुशच्या कामाचं कौतुक बॉलीवूड कलाकारांसह अनेकांनी केलं होतं. अशा या उत्कृष्ट अभिनेत्याला आता आणखी एक मोठी संधी मिळाली आहे. दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा अंकुश मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. बॉलीवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या चित्रपटात त्याची वर्णी लागली आहे.

अभिनेता अंकुश गेडामला पोलीस व्हायचं होतं. पण नागराज मुंजळेंनी त्याला ‘झुंड’ चित्रपटात घेतलं आणि अंकुशचं नशीबच पालटलं. अत्यंत सामान्य घरातून आलेल्या अंकुशने आपल्या दमदार अभिनयाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘झुंड’ चित्रपटात अंकुशने साकारलेली डॉनची भूमिका चांगली भाव खाऊन गेली होती. आता पुन्हा एकदा अंकुश नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार आहे.

हेही वाचा – “मी जेलमध्ये असताना माझ्या मित्रांबरोबर वडील दारू प्यायचे”, अभिनेत्री रिया चक्रवर्तीने स्वतः केला खुलासा, म्हणाली…

बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटात अंकुश झळकणार असल्याचं समोर आलं आहे. याबाबत अंकुशने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. अनुराग कश्यपबरोबरचा फोटो शेअर करत अंकुशने लिहिलं आहे, “इंडस्ट्रीत दोन वर्ष आणि दोन जबरदस्त दिग्दर्शकांबरोबर काम करणं हे स्वप्नाहूनही कमी नाहीये. अनुराग सर तुमच्याबरोबर काम करणं हे माझं स्वप्न होतं. तुम्ही फक्त चांगले दिग्दर्शकच नाही तर खूप चांगले माणूस आहात. तुम्ही मला आपल्या घरातल्या सारखं वागवलं. तुमच्याबरोबर काम करून मला खूप भारी वाटलं. प्रेक्षक लवकरच तुम्हाला मोठ्या पडद्यावर भेटण्यासाठी येत आहे. खूप सारं प्रेम.”

हेही वाचा – Video: घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान अभिषेक बच्चन व ऐश्वर्या रायचा लेकीबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले…

हेही वाचा – “हा एक माथेफिरू दिग्दर्शक…”, संतोष जुवेकरने अनुराग कश्यपसाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाला, “गेले काही दिवस…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंकुश गेडामच्या या पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता कैलास वाघमारे, शिवाली परब, गौरव मोरे, सायली पाटील आणि अनुराग कश्यप यांनी अंकुशचं कौतुक करत प्रतिक्रिया दिली आहे. तसंच अंकुशला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.